इस्रायलने सतत एअर स्ट्राइक करुन हिज्बुल्लाहच कबंरड मोडलं आहे. हसन नसरल्लाह, हाशिम सफीद्दीन आणि फौद शुक्रसह हिज्बुल्लाहच्या टॉप 11 कमांडर्सचा खात्मा केलाय. इस्रायलच्या कारवाईने हिज्बुल्लाहच्या अन्य दहशतवाद्यांच खच्चीकरण झालय. आता दहशतवाद्यांना हिज्बुल्लाहच्या तीन टॉप कमांडर्सकडून अपेक्षा आहेत. हे टॉप कमांडर्स कुठे आहेत? त्यांची पुढची प्लानिंग काय आहे? हे कोणाला माहित नाहीय. नईम कासिम, तलाल हामिह आणि अबु अली रिदा ही त्या तीन कमांडर्सची नाव आहेत.
1991 साली हिज्बुल्लाहचा जनरल सेक्रेट्ररी अब्बास अल-मुसावीने शेख नईम कासिमला डेप्युटी लीडर म्हणून नियुक्त केलं होतं. त्याच्या पुढच्याचवर्षी अल मुसावीच्या ताफ्याला 1992 साली इस्रायलच्या अपाचे हेलिकॉप्टरने टार्गेट केलं होतं. यात त्याचा मृत्यू झालेला. त्यानंतर नसरल्लाहने नेतृत्व हाती घेतलं. नईम कासिम आपल्या भूमिकेत कायम होता. इस्रायलसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर मागच्यावर्षी कासिमने परदेशी मीडियाला मुलाखत दिली.
कोण आहे तलाल हामिह?
तलाल हामिहला तलाल होस्नी हामिह, इस्मत मजरानी किंवा अबू जाफरच्या नावाने ओळखला जातो. त्याच्याकडे हिज्बुल्लाहच्या परदेशातील संचालनाची जबाबदारी आहे. हे यूनिट 910 च्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तलाल हामिह हिज्बुल्लाहच्या पहिल्या पिढीचा आहे. 1980 च्या मध्यापासून तो संघटनेशी जोडलेला आहे. तलाल त्या लोकांपैकी आहे, ज्यांचा थेट हसन नसरल्लाहशी संपर्क होता.
तो अज्ज्ञात स्थळी लपलाय
हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांना अपेक्षा आहे तो तिसरा व्यक्ती आहे, अबु अली रिदा. अबु हिज्बुल्लाहच्या बदर डिवीजनचा कमांडर आहे. इस्रायली सैन्य त्याचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन चालवत आहे. पण त्याचा ठावठिकाणा कोणालाही माहित नाही. हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडर्सवर एकापाठोपाठ एक हल्ले सुरु असल्यामुळे तो अज्ज्ञात स्थळी लपलाय.