India in UN : भारताने अनेकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. पण तरी देखील तो त्यातून धडा घेताना दिसत नाही. पाकिस्तानकडून सतत भारतविरोधी कारवाया सूरुच असतात. पण जेव्हा जेव्हा काश्मीरचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा भारत पाकिस्तानवर जोरदार हल्ला करतो. पण यावेळी पाकिस्तानसोबत तुर्कस्तानला देखील ऐकून घ्यावे लागले आहे. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उचलून धरल्याने पण भारताच्या शूर कन्येने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला तर झापलेच पण तुर्कस्तानला ही आरसा दाखवला आहे.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) 55 व्या सत्रात जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी पाकिस्तानला चांगलेच झापले. पाकिस्तानला त्यांच्या नापाक प्रयत्नांबाबत आरसा दाखवला. काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यावर इतर कोणीही बोलण्याची गरज नाही अशा शब्दात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर अनुपमा सिंग यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांचं जोरदार कौतूक होत आहे.
आयएफएस अनुपमा सिंह यांनी तुर्किये यांनी केलेल्या टिप्पणीवर पहिल्यांदा खेद व्यक्त केला आणि काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. यानंतर त्यांनी पाकिस्तानला खडसावले.
VIDEO | Here’s what India’s First Secretary Anupama Singh said while exercising the ‘Right of Reply’ at the 55th session of the UN Human Rights Council on Wednesday.
“With regard to the extensive references to India made by Pakistan, we note that it is deeply unfortunate for the… pic.twitter.com/YegHyG3J30
— Press Trust of India (@PTI_News) February 28, 2024
‘ज्या देशाचे हात जगभर पुरस्कृत दहशतवादाच्या रक्तपातामुळे ‘लाल’ झाले आहेत, त्या देशाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांचे सरकार त्यांचे खरे हित साधण्यात अयशस्वी ठरले आहे याची त्यांच्याच लोकांना लाज वाटते.’