Israel-Hamas War : इस्रायलची ‘लेडी फायटर’ अतिरेक्यांना एकटीच भिडली; 25 अतिरेक्यांना घातलं कंठस्नान

| Updated on: Oct 11, 2023 | 8:00 AM

इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हाहा:कार उडाला. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. सर्वत्र आगडोंब उसळला. त्यामुळे जो तो जीव वाचवण्याच्या तयारीत होता. पण इस्रायलची एक लेडी फायटर त्यावेळी...

Israel-Hamas War : इस्रायलची लेडी फायटर अतिरेक्यांना एकटीच भिडली; 25 अतिरेक्यांना घातलं कंठस्नान
hamas israel
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

तेल अवीव | 11 ऑक्टोबर 2023 : हमास आणि इस्रायल युद्धाचा आज चौथा दिवस आहे. इस्रायलने हमासवर (Israel-Hamas War) एकामागोमाग एक करून रॉकेटचा मारा केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 1600 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र रक्ताचे सडे आणि लोकांचा आक्रोश ऐकायला येत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये हेच चित्र आहे. मात्र, तरीही हे युद्ध सुरूच आहेत. हमासच्या अतिरेक्यांनी तर कहरच केला आहे. स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर या अतिरेक्यांनी अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायली नागरिकांना ओलीस धरलं जात आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, इस्रायलच्या एका लेडी फायटरने हमासच्या अतिरेक्यांना चांगलंच वठणीवर आणल्याचंही वृत्त आहे.

गाजा पट्टी परिसरात किबुत्ज निर एम नावाचं गाव आहे. या गावात हमासचे अतिरेकी आले. पण ते त्यांचं काहीच वाकडं करू शकले नाहीत. उलट हे अतिरेकी आले, पण परत जाऊ शकले नाहीत. या गावातील नागरिकांनी विशेषत: एका लेडी फायटरने जेवढ्या अतिरेक्यांनी गावात घुसण्याचा प्रयत्न केला, त्या एका एकाला कंठस्नान घातलं. इनबिल राबिन लिबरमॅन असं या महिलेचं नाव आहे. या लेडी फायटरने गावकऱ्यांच्या साथीने हमासच्या 25 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. देश युद्धाने पोळलेला असतानाच इनबिल राबिन लिबरमॅन हिने दाखवलेल्या धाडसाचं संपूर्ण इस्रायलमध्ये कौतुक होत आहे.

अतिरेक्यांशी अशी भिडली

इस्रायलवर हल्ला झाल्याचा 7 ऑक्टोबर रोजी सकाळी इनबलला अंदाज आला. आपल्या गावाला दहशतवादी निशाना बनवू शकतात असं तिला वाटलं. त्यामुळे ती धावतपळत घरात गेली. तिने गावकऱ्यांना गोळा केलं. एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली. त्यांना शस्त्रांचा पुरवठा केला. गावाच्या हद्दीत जो कोणी येईल त्याला सोडू नका, असे आदेशच तिने गावकऱ्यांना दिले. त्यानंतर काही वेळाने अतिरेक्यांनी या गावात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावकऱ्यांनी तात्काळ फायरिंग सुरू केली.

अतिरेक्यांना असा काही हल्ला होईल याची कल्पना नव्हती. अतिरेकी बेसावध असताना हा हल्ला झाला. त्यामुळे अतिरेकी बिथरले. त्यामुळे अतिरेक्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण इनबलसह गावकऱ्यांनी फायरिंग सुरूच ठेवली. त्यात अतिरेक्यांचा खात्मा झाला. गावात जेवढ्या अतिरेक्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जागीच खात्मा झाला. त्यानंतर किती अतिरेकी मारण्यात आले याची गणती करण्यात आली. तेव्हा 25 अतिरेकी ठार झाल्याचं दिसून आलं.

इनबलच्या शौर्याला सलाम

इनबल राबिन लिबरमॅन ही 25 वर्षीय आहे. इनबलमुळे अतिरेक्यांना गाजा पट्टीतीलच एका गावावर ताबा मिळवता आलेला नाही. 7 ऑक्टोबर रोजी एकीकडे इस्रायलमध्ये हाहा:कार उडालेला होता. तर दुसरीकडे इनबल अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याची योजना आखत होती. गावातील नागरिकांची सुरक्षा कशी केली जावी याची ती योजना तयार करत होती.

 

इनबल किबुत्ज निर एम गावाची सुरक्षा प्रमुख आहे. पोलीस, सुरघा दल, आणि गावातील नागरिकांमध्ये समन्वय साधण्याचं काम या सुरक्षा प्रमुखाचं असतं. डिसेंबरमध्ये इनबलला या गावाची सुरक्षाप्रमुख म्हणून नियुक्त केलं होतं. तिचे चुलते अमी राबिन यांच्या जागी तिची नियुक्ती करण्यात आली होती.

मुक्काम पोस्ट तेल अवीव

अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर आयडीएफने या गावाला खाली केलं आहे. इनबल तेल अवीवच्या एका हॉटेलात थांबली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी तिने तिचा वाढदिवसही साजरा केला. मेयर रॉन हल्दाई यांनी यावेळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या कर्तबगारीचं सोशल मीडियातून कौतुकही केलं. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही तिच्या शौर्याची दखल घेतली आहे.