नवी दिल्ली: रशिया-युक्रेन वाद दिवसागणिक चिघळत आहे. भारताला कच्च्या तेलातील (Crude Oil) भाववाढीच्या स्वरुपात संघर्ष झळा पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रित आणण्यासाठी केंद्र सरकार कच्च्या तेलाचा आपत्कालीन साठा वापरण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीवर नियंत्रण व पेट्रोल-डिझेलच्या (PETROL-DISEL PRICE) वाढत्या किंमतीला ब्रेक ही कारणं यामागे असल्याची माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. रशिया-युक्रेन परिस्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यासोबतच वाढत्या वादामुळं उद्भवणाऱ्या तुटवड्याच्या (OIL CRISIS) संभाव्य संकटावरही सरकार मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे.
पेट्रोलियम मंत्रालय स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हचा (SPR) वापर करू शकते. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळविले जाईल. मात्र, एसपीआरचे प्रमाण व तपशील याबाबत अद्याप माहिती जारी करण्यात आली नाही. भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची 5.33 मिलियन टन किंवा 39 मिलियन बॅरेलची क्षमता आहे. आर्थिक वर्ष 2020 च्या आकृतीबंधानुसार 9.5 दिवसांसाठी पर्याप्त ठरतो.
रशिया-युक्रेन (Russia-Ukraine crisis) युद्धाचे पडसाद सर्व पातळ्यांवर जाणवत आहे. खाद्यपदार्थांपासून पेट्रोल-डिझेलच्या विक्रमी भाववाढीचे संकेत दिले जात आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचे विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत. क्रूड तेलाचे भाव अद्यापही 100 डॉलर प्रति बॅरेलहून अधिकच आहे. आज (शुक्रवारी) ब्रेंट क्रूडचे भाव प्रति बॅरेल 101 डॉलरवर पोहोचले होते. भारतासारख्या क्रूड ऑईलच्या (Crude oil) आयातप्रधान देशासाठी वाढते भाव चिंताजनक ठरू शकतात. क्रूड तेल आयात करण्यासाठी गंगाजळीवर मोठा भार येऊ शकतो आणि राजकोषीय तूटीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलसोबतच गॅस भाववाढीची झळ सहन करावी लागेल.
कच्च्या तेलाच्या भाववाढीला रशिया-युक्रेन संकटाच कारण सांगितलं जातं. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संबंधामुळे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिकेनं रशियाची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे. यामुळे तेल पुरवठ्यावर थेट परिणाम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक राष्ट्रांनी प्रतिबंधात्मक मार्ग म्हणून इंधनाचे साठे करण्याचे निर्देश जारी केले आहेत.
इतर बातम्या:
Financial Tips : पहिल्या नोकरीतील ‘या’ चुका टाळा आणि व्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम
मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम, अटी व व्याजदर…