India maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या ताणले गेले आहेत. दोन्ही शेजारील देशामध्ये तणाव कायम आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक सरकार आल्याने संबंध संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. चीन याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या तयारीत आहे. तो मालदीवशी जवळीक वाढवत आहे.
भारत आणि मालदीव यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने आता विष पसरवरणारी बातमी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, भारत-मालदीवमधील संघर्ष प्रथम शेजारच्या बांधिलकीची चाचणी घेतो’. या लेखात हत्तीचा चेहरा असलेला माणूस दाखवला आहे. ज्याच्या हातात काटेरी छडी दिसतेय.
मालदीवशी भारताचे संबंध किती अस्वस्थ आहे हे या लेखात लिहिले आहे. ग्लोबल टाइम्सच्या मते, दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये भारताविरोधात नकारात्मकता वाढत आहे. मोदी सरकारने आता आपल्या पारंपरिक बिग ब्रदरचा विचार सोडून योग्य तोडगा काढावा.
लेखात असे लिहिले आहे की, आपली भक्कम स्थिती आणि नेबर फर्स्ट धोरण अवलंबत असले तरी देखील शेजारील देशांची मने जिंकण्यात अपयशी ठरत आहे. दोन शेजारी देशांमधील वादाचे कारण म्हणजे मालदीवमध्ये तैनात असलेले भारतीय सैनिक.
लेखात पुढे म्हटले आहे की मालदीवच्या नवीन सरकारने भारतीय सैनिकांना 10 मे पर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत, परंतु भारत सरकारने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. अशा स्थितीत हे मुत्सद्दी नाटक पुढे जाणे अपेक्षित आहे.
ग्लोबल टाइम्सने भारताकडून मालदीववर सतत दबाव आणल्याचा आरोप केला आहे. भारतीय तटरक्षक दल मालदीवच्या बोटींना रोखत आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात काहीही होऊ शकते. मोदी सरकारने मालदीवच्या विकास मदतीतही कपात केली आहे, यावरून सध्याच्या सरकारच्या विरोधातील उदासीनता दिसून येते.
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याने चीन देखील त्यात आणखी मीठ टाकण्याचं काम करत आहेत. चीनकडून पाठिंबा मिळत असल्याने मालदीवरचे राष्ट्राध्यक्ष देखील भारतविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत.