पाकिस्तानला साथ देणं तुर्कीला पडलं महागात, भारताने असा केला करेक्ट गेम?

| Updated on: Oct 24, 2024 | 7:39 PM

तुर्कीला ब्रिक्सचे सदस्य व्हायचे आहे. ब्रिक्सकडे पाश्चात्य विरोधी संघटना म्हणून पाहिले जाते. तुर्की जर ब्रिक्सचा सदस्य बनला तर रशियाचा हा मोठा राजनैतिक विजय असेल. कारण BRICS मध्ये सामील होणारा Türkiye हा पहिला नाटो देश असेल. मात्र भारताने त्याचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

पाकिस्तानला साथ देणं तुर्कीला पडलं महागात, भारताने असा केला करेक्ट गेम?
Follow us on

रशियामध्ये सध्या अनेक देशांचे प्रमुख नेते जमले आहेत. ब्रिक्स परिषदेसाठी हे नेते रशियात आलेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तेथे पोहोचले आहेत. ब्रिक्स देशांच्या समुहामध्ये आणखी काही देशांना सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यापैकीच एक देश म्हणजे तुर्की. त्यांना देखील ब्रिक्समध्ये सामील व्हायचे आहे. त्यांनी त्यासाठी अर्जही केलाय. मात्र भारताने त्यांचा प्रवेश रोखला आहे. बिल्ड या जर्मन वृत्तपत्राच्या अहवालात हा दावा करण्यात आलाय. अहवालात असे म्हटले आहे की, तुर्कीचा पाकिस्तानशी जवळचा संबंध असल्याने भारताने त्यांचा प्रवेश बंद केला आहे. आतापर्यंत ब्रिक्सचा विस्तार फक्त सर्वसहमतीने होत आहे. पण जर एकाही देशाची जर इच्छा नसेल तर दुसरा कोणताही देश त्यात सहभागी होऊ शकणार नाही. भारत हा ब्रिक्सचा संस्थापक सदस्य आहे.

गेल्या वर्षी झालेल्या ब्रिक्स परिषदेत आणखी चार नवीन सदस्य जोडले गेले होते. ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे ब्रिक्सचे 4 संस्थापक सदस्य आहेत. ब्रिक्सची स्थापना 2006 मध्ये झाली होती. ज्याची पहिली परिषद 2009 मध्ये झाली होती. 2010 मध्ये त्याचा प्रथम विस्तार करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेचा त्यात समावेश करण्यात आला. गट पाश्चिमात्य देशांच्या आर्थिक आणि राजकीय मक्तेदारीला आव्हान देतो.

2023 च्या शिखर परिषदे ब्रिक्सचा पुन्हा विस्तार झाला. ज्यामध्ये इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE यांचा सदस्य देश म्हणून समाविष्ट करण्यात आला होता. BRICS शिखर परिषद 2024 रशियाच्या कझान येथे आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेत रशियाच्या अध्यक्षांनी सांगितले की, ३० देशांना ब्रिक्सचे सदस्य व्हायचे आहे. ब्रिक्सच्या विस्तारात संस्थापक सदस्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, असे भारतीय पंतप्रधानांनी येथे सांगितले.

पुतीन यांच्या निमंत्रणावरून तुक्रीचे प्रमुख एर्दोगान बुधवारी कझान येथे पोहोचले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी येथे भेट होईल, अशी आशा होती, परंतु अशी कोणतीही बैठक झाली नाही. तुर्कीने गेल्या महिन्यात ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले जाते.

भारताने तुर्कियेचा मार्ग रोखला?

बिल्डने आपल्या अहवालात दावा केला आहे की, भारताने तुर्कीचा ब्रिक्समधील प्रवेश रोखला आहे. कारण भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानशी तुर्की देशाचा जवळचा संबंध आहे. मात्र, भारताकडून असे कोणतेही वक्तव्य आलेले नाही. तुर्कीशिवाय पाकिस्तानलाही ब्रिक्समध्ये सामील व्हायचे आहे. मात्र, भारतासोबतच्या संबंधांमुळे पाकिस्तानला प्रवेश मिळणे कठीण असल्याचे पाकिस्तानचे मत आहे.