नवी दिल्ली : भारत-कॅनडामधील राजकीय संबंध बिघडले आहेत. दिवसेंदिवस हा तणाव वाढत चालला आहे. आता कॅनडाकडून एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे. कॅनडाने आधी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हटवलं. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने कॅनडाच्या डिप्लोमॅट्सना देश सोडायला सांगितला. भारतातून 41 डिप्लोमॅट्सना मायदेशी बोलावलं, असं शुक्रवारी कॅनडाकडून सांगण्यात आलं. भारताने काही दिवसांपूर्वी कॅनडाला स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुम्ही दिल्ली उच्चायोगातील तुमच्या कर्मऱ्यांना माघारी बोलवून घ्या. अन्यथा त्यांना इम्युनिटी मिळणार नाही. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामधील संबंध बिघडले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता.
आता कॅनडाकडूनही असाच एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. कॅनडाने मुंबईतील आपलं व्हिसा आणि काऊन्सलर एक्सेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता ज्यांना कॅनडाला जायच असेल, त्यांना व्हिसासाठी हेड ऑफिस दिल्लीतून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. कॅनडाने हा निर्णय का घेतला? त्यामागे कुठलही कारण सांगितलेलं नाहीय. मुंबई ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, नागरिक त्यांच्या समस्यांसाठी आम्हाल मेल करु शकतात. सध्या ऑफिसमधून सर्व कामकाज बंद आहे. व्हिसाशी संबंधित सर्व काम आता दिल्लीतील ऑफिसमधून चालतील.
भारताची कठोर भूमिका
कॅनडाने जे आरोप केले, त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिला. भारताने जे निर्णय घेतले, त्यावर कॅनडाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. भारत आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन करतोय, असं कॅनडाच म्हणण होतं. भारताशिवाय कॅनडा असा एक देश आहे, जिथे शिखांची संख्या जास्त आहे. भारतातून कॅनडामध्ये जाऊन स्थायिक झालेल्या शिखांची संख्या मोठी आहे. आज तिथल्या राजकारणात शीख महत्त्वाची भूमिका बजावतायत. त्यामुळेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो मतांसाठी त्यांची बाजू घेतात. कॅनडामधून खलिस्तानी समर्थक नेहमीच भारतविरोधी कारवाया करत असतात. त्यावर ट्रूडो सरकारने कारवाई करावी, ही भारताची मागणी आहे.