VIDEO : जगण्याचा आशावाद, आजूबाजूला मृत्यूचं तांडव, पण त्यातही या चिमुरड्यांचं प्रेम प्रत्येकाचं मन जिंकतंय

| Updated on: Aug 22, 2021 | 1:36 PM

भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी मदत मोहिम सुरू केलीय. याचाच भाग म्हणून भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन आलं. या 168 जणांमध्ये एक चिमुरडा आणि त्याचं कुटुंबही होतं (Afghanistan baby on airport).

VIDEO : जगण्याचा आशावाद, आजूबाजूला मृत्यूचं तांडव, पण त्यातही या चिमुरड्यांचं प्रेम प्रत्येकाचं मन जिंकतंय
Follow us on

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हाहाकार माजवलाय. हजारो लोकांना आपलं राहतं घर सोडून जीव वाचवत स्थलांतर करावा लागतंय. त्यातही सगळेच जण आपला जीव वाचवून सुरक्षित स्थळी पोहचण्यात यशस्वी होत आहेत असंही नाही. अनेकांचा तालिबानपासून स्वतःला वाचवताना मध्येच मृत्यू झालाय. ही सर्व दृष्ये कमालीची अस्वस्थ करणारी आहेत. मात्र, त्यातही काही दृष्ये आशेचा किराण दाखवणारी आहे.

भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी मदत मोहिम सुरू केलीय. याचाच भाग म्हणून भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन आलं. या 168 जणांमध्ये एक चिमुरडा आणि त्याचं कुटुंबही होतं (Afghanistan baby on airport). त्याचा एक व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चांगलाच पसंतीला उतरत आहे.

व्हिडीओ पाहा :

युद्धजन्य परिस्थितीतही चिमुरड्यांकडून एकमेकांवरील निस्वार्थ प्रेम

एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन विमानतळावर बसलेली दिसत आहे. त्यावेळी या चिमुकल्याची बहिण या बाळाचे मुके घेते. ती या बाळाचा मुका घेते नंतर त्यालाही आपला मुका घेण्यास लावते. या युद्धजन्य परिस्थितीतही या चिमुरड्यांचं एकमेकांवरील प्रेम आणि खेळ पाहून पाहण्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटतंय. हा व्हिडीओ म्हणजे खडतर संकटातही जगण्याची आशा दाखवणारं चित्र आहे, असं मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

भारतीय हवाई दलाचं सी – 17 विमान काबुलहून 168 प्रवाशांना घेऊन भारतात गाझियाबाद विमानतळावर उतरलं. यानंतर या प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

अफगाणमधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न, 168 जणांना घेऊन विमान भारतात

भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून भारतात गाझियाबादमध्ये दाखल झालंय. या विमानात एकूण 107 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या मदतीने हे मदतकार्य करण्यात येत आहे. गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर हे विमान 168 प्रवाशांसह लँड झालं.

शनिवारी (21 ऑगस्ट) 87 भारतीयांसह एअर इंडियाच्या एका विमानाने उड्डान घेतलं. लॉजिस्टिक्स संबंधित अडचणींमुळे या विमानाला उड्डान करण्यास अडथळे आले. सध्या ते विमान अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या नियंत्रणात आहे. विमान तळाच्या बाहेर तालिबानचं नियंत्रण असलेल्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे.

मागील 24 तासात भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 390 भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलंय. असं असलं तरी अद्यापही अनेक भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत.

हेही वाचा :

पंजशीर खोऱ्यातील युद्धाच्या आव्हानाला तालिबान घाबरला; म्हणाला…

Indian in Afghanistan : अफगाणमधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न, 168 जणांना घेऊन विमान भारतात

Afghanistan Photo : पोलादी हातात चिमुकली बाळं, सैन्यांकडून लेकरांसाठी छातीचा कोट, हृदय पिळवटून टाकणारे फोटो

व्हिडीओ पाहा :

 

Indian Airforce save a infant from Kabul Afghanistan evacuate to India