सौदी अरेबिया हा देश अत्याधुनिक सोयी-सुविधा, राहणीमानासाठी जसा ओळखला जातो, तसाच वाळंवटासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. सौदी अरेबियात अगदी दूर-दूर पर्यंत नजर जाईल इतका वाळवंटी प्रदेश पसरलेला आहे. सौदी अरेबियाच्या दक्षिणेला वाळवंट आहे. हा भाग एम्प्टी क्वार्टर म्हणजे रब अल-खली म्हणून ओळखला जातो. सौदी अरेबियाच्या याच वाळवंटी प्रदेशात एक भारतीय रस्ता भरटकला होता. हा NRI तेलंगणचा राहणार होता. कडकडीत ऊन आणि वाळवंटात फसलेल्या या भारतीय NRI चा डीहायड्रेशमुळे अखेर मृत्यू झाला. सतत चालत राहिल्यामुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी होऊन या व्यक्तीचा मृत्यू झाला. सौदी अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात कडकडीत ऊन असतं.
मरण पावलेल्या व्यक्तीच नाव मोहम्मद शहजाद खान आहे. त्याचं वय 27 वर्ष आहे. मोहम्मद शहजाद तेलंगणच्या करीमनगरचा राहणार होता. मोहम्मद शहजाद सुदानच्या एक नागरिकासोबत सौदी अरेबियाच्या वाळवंटात होता. त्यावेळी अचानक त्याला GPS सिग्नल मिळणं बंद झालं. त्यानंतर लगेच त्याच्या मोबाइल फोनची बॅटरी संपली. त्याच्या गाडीतील तेलही संपलं.
रुब अल खली खतरनाक वाळवंट
त्यानंतर शहजाद आणि सुदानी नागरिक चार दिवस वाळवंटात अडकून राहिलेत. कडक ऊन, गर्मी आणि खाणं-पिणं नसल्याने दोघांचा मृत्यू झाला. शहजाद मागच्या तीन वर्षांपासून सौदी अरेबियाच्या एका TELECOMMUNICATION कंपनीमध्ये नोकरी करत होता. रुब अल खलीच्या वाळवंटात दोघांचा मृत्यू झाला. हा भाग जगातील खतरनाक वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जातो. हे वाळवंट 650 किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे.
भीषण गर्मीचा हज यात्रेकरुंना फटका
सौदी अरेबियात यावर्षी प्रचंड गर्मी पडली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला. भीषण गर्मीमुळे 2700 पेक्षा जास्त यात्रेकरुन आजारी पडले. यावर्षी 18 लाख लोक हज यात्रेला गेले. भीषण गर्मीमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इजिप्तच्या सर्वाधिक 323 हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला. भारताच्या 68 यात्रेकरुंचा हज दरम्यान मृत्यू झाला. जॉर्डनच्या एकूण 60 हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला.