जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज 12 वा दिवस आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलवर हल्ला केला. यात 1300 इस्रायलींचा मृत्यू झाला. हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला करताना क्रूरतेचा कळस गाठला. हमासचे दहशतवादी निरपराध इस्रायलींच्या घरात घुसले. त्यांनी अत्यंत निदर्यतेने या इस्रायली नागरिकांची हत्या केली. त्यांची घर पेटवून नष्ट केली. हमासचे दहशतवादी घुसल्यानंतर इस्रायली नागरिक सुरक्षित आश्रय स्थळाच्या दिशेने धावले किंवा घरातच अडकले. हमासच्या या दहशतवादी हल्ल्यातून एक भारतीय महिला बचावली. तिच नाव सबिता आहे. मूळची ही महिला केरळची आहे. तिने तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला.
X वर तिने व्हिडिओ अपलोड करुन तिला आलेला भयानक अनुभव सांगितला. अनेकांनी तिला भारताची सुपरवुमन म्हटलं आहे. सबिता इस्रायलमध्ये केअरगिव्हरच काम करते. इस्रायलमध्ये वयोवृद्ध नागरिकांना संभाळणाऱ्यांना केअरगिव्हर म्हटलं जातं. तिने आणि मीरा मोहन नावाच्या महिलेने हमासच्या दहशतवाद्यांपासून इस्रायली नागरिकांचे प्राण वाचवले. हमासचे दहशतवादी आले, तेव्हा सबिता आणि मीराने त्यांना दरवाजावरच रोखलं. त्यांना दरवाजा उघडू दिला नाही. अन्यथा गोळीबारात इस्रायली नागरिकांनी आपले प्राण गमावले असते.
‘सेफ्टी रुमच्या दिशेने धावत सुटलो’
“मी मागच्या तीन वर्षांपासून इस्रायलच्या सीमावर्ती क्षेत्रात काम करतेय. इथल्या एका घरात आम्ही दोघी केअरगिव्हर म्हणून काम करतो. एका वृद्ध महिलेच्या देखभालीची जबाबदारी आमच्यावर आहे. माझी रात्रपाळी होती. मी सकाळी 6.30 वाजता निघणार होती. आम्ही सायरनचा आवाज ऐकला व सेफ्टी रुमच्या दिशेने धावत सुटलो” असं सबिताने सांगितलं.
भारतीय वीरांगनाएं ! 🇮🇳🇮🇱
मूलतः केरला की रहने वाली सबिता जी, जो अभी इजराइल में सेवारत हैं, बता रही हैं कि कैसे इन्होने और मीरा मोहन जी ने मिलकर इसरायली नागरिकों कि जान बचाई। हमास आतंकवादी हमले के दौरान इन वीरांगनाओं ने सेफ हाउस के दरवाजे को खुलने ही नहीं दिया क्योंकि आतंकवादी… pic.twitter.com/3vu9ba4q0d
— Israel in India (@IsraelinIndia) October 17, 2023
‘गोष्टी हाताबाहेर चालल्या आहेत’
“आम्हाला त्या महिलेच्या मुलीने सांगितलं की, गोष्टी हाताबाहेर चालल्या आहेत. काय करायच हे आम्हाला समजत नव्हतं. तिने आम्हाला पुढचं आणि मागचा दरवाजा बंद करायला सांगितला. काही मिनिटात दहशतवादी आमच्या घरात घुसल्याचा आवाज ऐकू आला. त्यांच्या गोळीबारात ग्लासेस फुटले. आम्ही त्यांना जवळपास अर्धातास दरवाजावरच रोखून धरलं. बाहेरुन दरवाजा खोलून ते आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही त्यांना दरवाजावरच कसबस रोखून धरलं. त्यांनी दरवाजावर गोळ्या चालवल्या” असं सबिता म्हणाली. काहीवेळाने इस्रायली लष्कर आमच्या मदतीसाठी आलं असं सबिता म्हणाली.