भारतीय वंशाच्या CEO चा अमेरिकेत 84 तास काम करण्याचा फंडा, आता जीवे मारण्याचा धमक्या

| Updated on: Nov 19, 2024 | 7:00 AM

daksh gupta: माझ्या टि्वटनंतर 20 टक्के मेसेज मला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे आहे. तसेच 80 टक्के मेसेज नोकरीसाठी अर्ज करण्याचे आहे. ते म्हणतात, तुम्ही कर्मचाऱ्यांना योग्य मोबादला देत असाल तोपर्यंत हे ठीक आहे. अन्यथा ही आधुनिक गुलामगिरी आहे.

भारतीय वंशाच्या CEO चा अमेरिकेत 84 तास काम करण्याचा फंडा, आता जीवे मारण्याचा धमक्या
daksh gupta
Follow us on

अमेरितील भारतीय सीईओचा एक सल्ला चांगलाच महागात पडू लागला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपच्या भारतीय वंशाच्या सीईओला 84 तास काम करण्याचा फंड्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. ते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील ग्रेप्टाइल कंपनीत आहे. दक्ष गुप्ता असे त्यांचे नाव आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्रेप्टाइल कंपनीच्या कार्यसंस्कृतीबद्दल पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी आठवड्यातून 84 तास काम करण्याबाबत लिहिले होते. त्यानंतर हा मुद्दा तापला. आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या आहेत.

84 तास कामाचा फंडा

अमेरिकन एआय स्टार्टअप ग्रेप्टाइलचे सीईओ दक्ष गुप्ता यांनी दावा केला आहे की, ग्रेप्टाइल कंपनीची कार्यसंस्कृती उघड केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्यांनी पारदर्शकतेवर भर देत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये ग्रेप्टाइल कंपनीत असणाऱ्या आठवड्यातील 84 तास काम आणि वर्क-लाइफ बॅलन्सबद्दल चर्चा केली. यामुळे तो चर्चेचा विषय बनला आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

शनिवारी सुरु असते काम

दक्ष गुप्ता यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ग्रेप्टाइल कंपनीत आठवडा 84 तासांचा असतो आणि घड्याळे रात्री उशिरापर्यंत चालतात. कंपनीतील कर्मचारी अगदी विकेंडलाही काम करतात. अलीकडेच मी कंपनीकडे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पहिल्या मुलाखतीतच सांगू लागलो की ग्रेप्टाइलमध्ये वर्क-लाइफ बॅलन्स नाही. साधारणत: दररोज कर्मचाऱ्यांचे काम सकाळी 9 वाजता सुरू होते. तसेच रात्री 11 वाजता संपते. आम्ही शनिवारी आणि कधीकधी रविवारी देखील काम करतो. त्याचे ट्विट झपाट्याने व्हायरल झाले. त्याला लाखो व्ह्यूज मिळाल्या आहेत.

अन्यथा ही गुलामगिरी

दक्ष गुप्ता यांनी लिहिले की, माझ्या टि्वटनंतर 20 टक्के मेसेज मला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे आहे. तसेच 80 टक्के मेसेज नोकरीसाठी अर्ज करण्याचे आहे. ते म्हणतात, तुम्ही कर्मचाऱ्यांना योग्य मोबादला देत असाल तोपर्यंत हे ठीक आहे. अन्यथा ही आधुनिक गुलामगिरी आहे.