नवी दिल्ली: गुगल, ट्विटर, आयएमएफ या सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कंपन्या भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मोठी जबाबदारी देत आहेत. ट्विटरच्या साीईओपदी नुकतीच आयआटी मुंबईतून शिकलेल्या पराग अग्रवाल (Parag Agrawal ) यांची निवड करण्यात आली होती, त्यानंतर गीता गोपीनाथन (Geeta Gopinathan) यांची आयएमएफमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. आता भारतीय वंशाजे जगदीप सिंह (Jagdeep Singh) यांना अमेरिकेतील कंपनीनं 17 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. जगदीप सिंह यांना देण्यात आलेलं पॅकेज हे अॅलन मस्कच्या तोडीचं आहे.
जगदीप सिंह हे भारतीय वंशाचे सीईओ असून त्यांना अमेरिकेतील बॅटरी बनवणाऱ्या क्वांटमस्केप कॉर्प या कंपनीनं 17 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. यानंतर माध्यमांमध्ये जगदीप सिंह यांच्या नावाची चर्चासुरु आहे. ही कंपनी केवळ एका वर्षापूर्वी स्थापन झालेली असून क्वाटमस्केप कॉर्प कंपनीचे संस्थापक सीईओ आहेत.
जगदीप सिंह यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार त्यांनी 2001 ते 2009 या काळात इनफिनेरा या संस्थेचे संस्थापक सीईओ म्हणून काम केलं होतं. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी क्वांटमस्केप कॉर्प कंपनीची स्थापना केली होती. 2001 पूर्वी जगदीप सिंह अनेक कंपन्यांचे संस्थापक राहिलेले आहेत. त्यामध्ये lightera Networks, Airsoft या कंपनीमध्येही जगदीप सिंह यांनी काम केलं आहे. जगदीप सिंह यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं. कॅलिफोर्निया विद्यापीठ, मेरिलँड कॉलेज विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतलंय.
बिल गेटस यांच्या वेंचर फंड आणि वॉक्सवॅगननं क्वांटमस्केप कॉर्पमध्ये गुंतवणूक केली आहे. क्वांटम स्केप कॉर्प आता नव्या पिढीच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. जगभरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळं क्वांटम स्केप कॉर्प ही कंपनी लीथियम आयन बॅटरीला किफायतशीर किमतीमधील पर्याय देण्याचं काम करत आहे.
इतर बातम्या:
सोयाबीनचे तेच कापसाचे, दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम? हा आहे मधला मार्ग
Indian origin Jagdeep Singh who is ceo of QuantumScape Corp and his salary package is more than 17 thousand crore rupees