ही बातमी आहे अफगाणिस्तानची, घडतेय पाकिस्तानच्या भूमीवर, घडवणारे आहेत भारतीय आणि चर्चा आहे ती जगभर. होय, ही बातमीच तशी आहे. तालिबानच्या जोखडातून सुटका करण्यासाठी दोन बहिणींनी जवळपास दीड कोटी रुपये खर्च केलेत. ह्या दोन्ही सख्या बहिणी असून दोन्ही भारतीय आहेत. त्यातली एक बहिणी ही दिल्लीत रहाते तर दुसरी बहिण ही जिब्राल्टरला. दोघींनी त्यांच्या आईच्या स्मरनार्थ दीड कोटी रुपये खर्च करुन 5 कुत्री, 1 मांजर आणि 92 अफगाण महिला मुलांची ताबिलान्यांच्या तावडीतून सुटका केलीय. हे सर्व जण सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आहेत. तिथून ते आता नेमके कोणत्या देशात सेटल होणार याची चाचपणी सुरु आहे. पण सर्व जण सुरक्षित आहेत कारण त्यांचा तालिबान्यांपासून बचाव करणारी टीम ही इस्त्रायल आणि अमेरीकन आहे. हे सर्व जण तिसऱ्या देशात म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान सोडून सेटल होणार आहेत.
का मदत केली भारतीय बहिणींनी?
हे मिशन होतं ऑपरेशन मॅझिक कार्पेट नावाचं. सहा पाळीव प्राणी, 30 महिला, 32 लहान मुलं यांचा वाचवण्यात आलंय. ह्या सर्वांना अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आणलं गेलं. तेही हवाई किंवा समुद्रमार्गे नाही तर डोंगर-दऱ्या पार करत जमीनमार्गाने. बरं हे सर्व जण एका दिवसातही पोहोचू शकले नाहीत. यात काही व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत, काही एक्झिक्युटीव्ह आहेत तर काही माजी सुरक्षा अधिकाऱ्यांची कुटूंब आहेत. वेळोवेळी त्यांना सुरक्षित घरात ठेवण्यात आलं आणि मजल दर मजल करत त्यांना काबूल ते इस्लामबाद असं ट्रॉन्सपोर्ट केलं गेलंय. ह्यात एक 90 वर्षांची एक महिलाही आहे आणि याच मिशन दरम्यान जन्मलेलं एक बाळही आहे. ह्या सर्व मोहीमेला जवळपास 3 कोटी रुपये खर्च आला. आणि त्यातला निम्मा खर्च हा दोन भारतीय बहिणींनी केलाय. कारण त्यांची आई पाकिस्तानमधून फाळणीच्या वेळेस भारतात आली होती आणि स्थलांतराची वेदना, जुलमी राजवटी याचा अनुभव ह्या कुटुंबाला होता. आईकडून ह्या दोन्ही बहिणींनी हे खुप वेळा ऐकलं होतं. त्याच वेदनेतून त्यांनी दीड कोटी रुपये ह्या अफगाण लोकांसाठी खर्च केलेत.
नेमक्या कोणत्या देशात जाणार?
ज्यांना वाचवण्यात आलंय ते सर्व जण पाकिस्तानात आहेत. तिथून ते युरोप, अमेरीका, इस्त्रायल अशा कुठल्या तरी तिसऱ्या देशात सेटल होण्याची प्रकिया त्यांची सुरु आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पार पाडण्यात येतेय. वेगवेगळ्या देशांकडे त्यासाठी विचारणा केली जातेय. यातले 30 जण हे मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या मेहीव अॅनिमल चॅरीटीशी संबंधीत आहेत. ह्या ट्रस्टच्या पॅट्रॉन ह्या मेघन मर्केल आहेत. त्या ब्रिटीश रॉयल फॅमिलीशी संबंधीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या देशात जागा मिळणं थोडं सोप्पं जाईल असं दिसतंय.
हे सुद्धा वाचा:
Kolhapur | कोणत्याही परिस्थितीत कामावर येणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार
जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले, बंधन नाही