न्यूजर्सी: बीड येथील बालाजी रुद्रवार आणि त्यांची पत्नी आरती यांचा अमेरिकेतील न्यूजर्सीच्या अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झाला. दोघांच्याही अंगावर चाकूने भोसकल्याचे वार होते. आरती ही सात महिन्यांची गर्भवती असतानाही तिच्यावर वार करण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं? या दोघांची हत्या होण्यामागचं कारण काय? त्यावर या 10 पॉइंट्समधून टाकलेला हा प्रकाश. (Indian Techie Pregnant Wife Death Case: 10 Things To Know)
1. 32 वर्षीय बालाजी आणि 30 वर्षीय आरती हे 21 गार्डन टेरेस, नॉर्थ अर्लिंग्टन येथे राहत होते. ऑगस्ट 2015मध्ये ते अमेरिकेत राह्यला आले होते. डिसेंबर 2014मध्ये त्यांचा विवाह झाला होता. बालाजी हे आयटीमध्ये कामाला होते.
2. बालाजी रुद्रवार हे न्यूजर्सीमधील एका आघाडीच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरीला होते. तर आरती या गृहिणी होत्या.
3. आरती ही सात महिन्यांची गर्भवती होती. आरतीचे सासरे भारत रुद्रवार यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांना या हत्येमागे काही कारण असावं असं वाटत नाही. दोघेही सुखी आणि आनंदी होते. त्यांचे शेजारीही चांगले होते, असं रुद्रवार यांनी सांगितलं.
4. कौंटीच्या वकिलाने काढलेल्या प्रेसनोटनुसार, स्थानिक पोलीस रुद्रवार यांच्या घरात घुसले असता त्यांना दोघांचे मृतदेह आढळून आले.
5. अमेरिकेतील मीडियानुसार बालाजीने घरातच आरतीवर वार केले आणि तिच्या पोटात भोसकले.
6. 7 एप्रिल रोजी बालाजीच्या शेजाऱ्याने 911 या नंबरवरून अर्लिंग्टन पोलिसांना संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी फोन केला होता. यावेळी त्यांनी शेजारच्या रुममध्ये दोन लोक निपचित पडलेले असून एक मुलगी रडत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं, असं बर्गन कौंटीचे वकील मार्क मुसेला यांनी सांगितलं.
7. नॉर्थ अर्लिंग्टन पोलीस विभाग आणि बर्गन कौंटी प्रोसेक्युटर्स ऑफिस दोन्ही मिळून या गुन्ह्याचा तपास करत आहेत. गुरुवारी हा धक्कादायक प्रकार घडल्याचं स्थानिक पोलिसांनी मला सांगितलं. मृत्यूच्या कारणाचा अद्याप पत्ता लागला नाही. मात्र, अटोपसी रिपोर्ट येताच तो तुम्हाला दाखवला जाईल, असं अमेरिकेच्या पोलिसांनी मला सांगितलं, अशी माहिती भारत रुद्रवार यांनी दिली.
8. भारत रुद्रवार हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील उद्योजक आहेत. मुंबईपासून 500 किलोमीटरच्या अंतरावर बीड आहे.
9. रुद्रवार यांच्या मृत्यूचं कारण कळण्यासाठी तपास यंत्रणा वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. मात्र, प्राथमिक चौकशी नुसार दोघांचाही मृत्यू भोसकून करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
10. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 8 ते 10 दिवसात दोघांचेही मृतदेह बीडला पोहोचणार आहेत. रुद्रवार यांची चार वर्षाची मुलगी रुद्रवार यांच्या न्यूजर्सीमधील मित्रांकडे आहे. माझी नात माझ्या मुलाच्या मित्राच्या घरी आहे. त्याचे अमेरिकेत अनेक भारतीय मित्र आहेत, असं भारत रुद्रवार यांनी सांगितलं. (Indian Techie Pregnant Wife Death Case: 10 Things To Know)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 12 April 2021 https://t.co/cvDoUSh8b3
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
संबंधित बातम्या:
अंबाजोगाईच्या ‘त्या’ कपलचं अमेरिकेत काय झालं?; नवऱ्यानेच बायकोला भोसकलं?, वाचा सविस्तर
अंबाजोगाईच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
(Indian Techie Pregnant Wife Death Case: 10 Things To Know)