वॉशिंग्टन: अखेर कोवॅक्सिनला (Covaxin) लस घेतलेले भारतीय प्रवासी 8 नोव्हेंबरपासून अमेरिकेत प्रवेश करू शकतात. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोविड-19 प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीला बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता मिळाल्यानंतर अमेरिकेने गुरुवारी आपल्या परदेशी प्रवासी धोरणात सुधारणा केली. ही भारतीय प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक बाब आहे कारण अनेक भारतीय प्रवासी भारतीय बनावटीची कोवॅक्सिन लस घेतल्यामुळे त्यांना अमेरिकेत प्रवेशाला बंदी असल्याने भारतात अडकले होते. (Indian travellers can enter USA with Covaxin vaccine after WHO approval)
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला आपत्कालीन वापर लसींच्या सूचीत (EUL) मंजूर केल्याची माहिती दिली. नवीन अमेरिकेच्या प्रवास नियमात आता Pfizer-BioNTech, Johnson & Johnson, Moderna, Oxford-AstraZeneca, Covishield, Sinopharm Sinovac आणि Covaxin द्वारे पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांना प्रवेशाला मान्यता आहे.
WHO’s EUL procedure assesses the quality, safety and efficacy of #COVID19 vaccines and is a prerequisite for #COVAX vaccine supply. It also allows countries to expedite their own regulatory approval to import and administer COVID-19 vaccines.pic.twitter.com/jJyS1hiz44
— World Health Organization (WHO) (@WHO) November 3, 2021
जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वतंत्र सल्लागार समितीच्या तांत्रिक सल्लागार गट (TAG) ने कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी (EUL) दर्जा देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर बुधवारी WHO ने कोवॅक्सिनलाआपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. कोवॅक्सिन ही लस कोविड 19 च्या लक्षणाविरोधात 77.8 टक्के परिणामकारक ठरली आणि नवीन डेल्टा वेरिएंटविरोधात 65.2 टक्के संरक्षण करायला परिणामकारक ठरली आहे.
#UPDATE The World Health Organization (#WHO) on Wednesday issued an emergency use listing for the India-made #Covaxin vaccine, in a move expected to increase Covid-19 jabs available in poor countries https://t.co/ng9bniSzoC pic.twitter.com/ggTuU82U4K
— AFP News Agency (@AFP) November 3, 2021
Other News
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! तीन वर्षांच्या लेकराने फटाका गिळला, अतिसाराने मृत्यू https://t.co/5g9UH4YiQO #FireCracker | #Gujarat |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2021