रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत (India) – पाकिस्तान (Pakistan) संबंधांवर देखील काही मजेदार मीम्स शेअर होत आहेत. मात्र हे सर्व चालू असतानाच पुन्हा एकदा भारत -पाकिस्तान संघर्ष उफाळून आला आहे. बुधवारी भारताकडून तांत्रिक बिघाडामुळे एक मिसाईल (Indian Missile) सुटले आणि पाकिस्तानचे धाबे दणाणले. हे मिसाईल पाकिस्तानच्या हद्दीत पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या मिसाईलवरून पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून ते संरक्षण मंत्र्यापर्यंत सर्वांनीच भारतावर गंभीर आरोप केला आहे. या मिसाईलने दोन्ही देशांच्या लोकांचे जीव धोक्यात आणल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या संरक्षण प्रवक्तत्याने दिली आहे. तसेच हे मिसाईल भारताने जाणूनबूजून डागल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी एका प्रवक्त्याने बोलताना म्हणले की, यावेळी भारताच्या थैलीमधून बिल्ली नाही तर बिल्ला पाकिस्तानमध्ये आला आहे. हे मिसाईल जरी तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानी हद्दीत कोसळले असले, तरी देखील तेथील लोकांमध्ये या घटनेने खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारताच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे की, काही तात्रिक बिघाडामुळे हे मिसाईल पाकच्या हद्दीत कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, या सर्व प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
इस्लामाबादच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या ‘सुपर-सॉनिक फ्लाइंग ऑब्जेक्ट’द्वारे त्यांच्या हवाई क्षेत्राचे विनाकारण उल्लंघन” केल्याचा निषेध केल्यानंतर भारताने हे स्पष्टीकरण जारी केले आहे. तर भारताने अविवेकी पद्धतीने मिसाईल डागले आणि मालमत्तेचे नुकसान केले आणि पाकिस्तानी हवाई हद्दीतील नागरिकांचा जीव आणि विमाने धोक्यात आणली, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण तज्ज्ञांनी भारताला धोक्याची सूचना आधीच दिली होती असा आरोपही पाकिस्तानेने केला आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन वेळा टोकाचा संघर्ष झाला आहे. तर मागे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
भारताची चूक दाखवण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. अशावेळी त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे भारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले. मात्र हे मिसाईल भारताने जाणून बुजूनच डागल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. यावरून पाकिस्तानचे संरक्षण मंत्रालय आणि मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून भारतावर आरोप होत आहेत. भारत पाकिस्तानवर कुरघोडी करत आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात अब भारत की थैलीसे बिल्ली नही, इसबार तो बिल्ला निकल आया असे पाकने म्हटले आहे. हे मिसाई जाणून बुजून जरी डागण्यात आले नसले तरी देखील या मिसाईलमुळे पाकिस्तानात खळबळ उडालीये.