Iran Attacks Israel : हल्ल्यानंतर इराणचा मोठा दावा, तेहरानमध्ये सेलिब्रेशन

| Updated on: Oct 02, 2024 | 9:39 AM

Iran attack Israel : मिडिल ईस्टमध्ये तणाव टोकाला पोहोचला आहे. इराणने इस्रायलवर मिसाइल हल्ला केला आहे. त्यानंतर सगळ्या जगात चिंता आहे. या हल्ल्यानंतर इराणकडून मोठा दावा करण्यात आला आहे. इराणमध्ये विविध ठिकाणी सेलिब्रेशन करण्यात आलं.

Iran Attacks Israel : हल्ल्यानंतर इराणचा मोठा दावा, तेहरानमध्ये सेलिब्रेशन
Iran attack Israel
Follow us on

इराणने मंगळवारी ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 2’ लॉन्च केलं. त्यांनी इस्रायलवर जवळपास 200 बॅलेस्टिक मिसाइल्स डागले. यावर्षी एप्रिल महिन्यातही इराणने इस्रायलवर अशाच प्रकारचा हल्ला केला होता. हा हल्ला त्यापेक्षाही मोठा आणि अचूक होता असा इराणचा दावा आहे. इराणी मिसाइल्स इस्रायलमध्ये पोहोचण्याआधीच नष्ट केली जातात. पण इराणचा दावा आहे की, त्यांची 90 टक्के मिसाइल्स टार्गेटपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. इस्रायली डिफेन्स फोर्सचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलवर 180 पेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. इराणने सेंट्रल इस्रायल आणि दक्षिण इस्रायलवर हा हल्ला केला. इराणची बहुतांश मिसाइल्स इस्रायली एअर डिफेन्स आणि अमेरिकेच्या एअर डिफेन्सने हवेतच पाडली असं IDF प्रवक्त्याने सांगितलं.

इराणच्या हल्ल्यात नेमकं किती नुकसान झालं? त्याची ठोस माहिती इस्रायलने दिलेली नाही. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाकडून सुद्धा कुठलही स्टेटमेंट आलेलं नाही. टाइम्स ऑफ इस्रायलच्या बातमीनुसार, एक पॅलेस्टिनीचा मृत्यू झाला असून 2 इस्रायली नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलचे तीन एअरबेस नेवातिम, हत्जेरिम आणि तेल नोफ यांच्यावरील हल्ला यशस्वी झाला आहे. या एअर बेसवरील 20 फायटर जेट नष्ट झाल्याचा दावा इराणच्या IRGC कडून करण्यात आला. या एअर बेसवर इस्रायलचे F-35 आणि F-15 फायटर जेट्स तैनात होते असं इराणकडून सांगण्यात आलय. हिज्बुल्लाह चीफ सैय्यद हसन नसरल्लाहच्या हत्येसाठी याच जेट्सचा वापर करण्यात आला होता.


म्हणून संयम बाळगला, इराणचे सैन्य प्रमुख काय म्हणाले?

IRGC कडून हल्ला यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे इराणच्या काही भागात सेलिब्रेशन करण्यात आलं. अलीकडे इस्रायलने प्रत्येक आघाडीवर इराणला धक्का दिला होता. हमासच्या प्रमुखाला इराणमध्ये घुसून संपवलं. त्यानंतर इराणचा विश्वासू हिज्बुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहला मारलं. त्यामुळे या हल्ल्याच्या निमित्ताने इराणने सेलिब्रेशनची संधी साधून घेतली. इराणचे सैन्य प्रमुख जनरल मोहम्मद बघेरी यांनी सांगितलं की, “आमच्याकडे इस्रायलच्या आर्थिक क्षेत्रावर हल्ला करण्याची क्षमता आहे. पण आम्ही सैन्य तळांना टार्गेट केलं. अमेरिकेचं संयम बाळगण्याच आवाहन आणि गाजामधील शस्त्रसंधींच्या आश्वासनामुळे आम्ही असं केलं”