Iran Attack on Israel : इराणमध्ये दम नाही का? इस्रायलवर हल्ला करुन काही तासात पलटी

| Updated on: Apr 14, 2024 | 7:06 AM

Iran Attack on Israel : सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये 1 एप्रिलला इराणच्या दूतावासावर इस्रायलकडून एअर स्ट्राइक करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इराणने लगेच त्यांचं स्टेटमेंट जारी केलय.

Iran Attack on Israel : इराणमध्ये दम नाही का? इस्रायलवर हल्ला करुन काही तासात पलटी
iran drone attack on israel
Follow us on

इराणने इस्रायलवर पहिल्यांदाच थेट हल्ला केला आहे. इराणने 100 पेक्षा जास्त ड्रोनद्वारे हा हल्ला केल्याच इस्रायलची डिफेन्स फोर्सकडून (IDF) सांगण्यात आलं. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू या्ंनी लगेच डिफेन्स फोर्स आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत वॉर मीटिंग केली. हल्ल्यानंतर काही तासात इराणची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. यात ते युद्ध समाप्तीबद्दल बोलले आहेत. इस्रायलवरील ड्रोन हल्ला संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अनुच्छेद 51 वर आधारित होता, असं इराणकडून सांगण्यात आलय. सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये 1 एप्रिलला इराणच्या दूतावासावर इस्रायलकडून एअर स्ट्राइक करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हा ड्रोन हल्ला केला आहे. प्रत्युत्तर दिल्यानंतर आता विषय संपला असं तुम्ही समजू शकता, असं इराणने म्हटलं आहे. एक प्रकारे इराणने आता विषय वाढवू नका, युद्ध नको अशी भूमिका घेतली आहे.

इराणने आपल्या अधिकृत संदेशात इस्रायल सोबतच अमेरिकेला सुद्धा थेट इशारा दिला आहे. “इस्रायली सरकारने अजून एक चूक केली, तर आमची प्रतिक्रिया खूप गंभीर असेल. हा संघर्ष इराण-इस्रायलमध्ये आहे. अमेरिकेने या पासून लांब राहवं” असं इराणने म्हटलं आहे. इराणच हे वक्तव्य म्हणजे युद्ध नको अशी भूमिका झाली. इस्रायल पूर्णपणे सर्तक आहे. इस्रायलने आपला एअरस्पेस पूर्णपणे बंद केला आहे. एअर फोर्स आणि नौदल पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर आहे. बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. इराण मिसाइल हल्ला सुद्धा करु शकतो अशी इस्रायलला शक्यता वाटते.

बॉम्ब शेल्टरच्या जवळ राहण्याचे निर्देश

इस्रायलने उत्तरी गोलान हाइट्स, दक्षिणी इस्रायलय अन्य क्षेत्रातील लोकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बॉम्ब शेल्टरच्या जवळ राहण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनने इस्रायलवरील धोका टाळलाय असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

अमेरिकेने पाडलं इराणच ड्रोन

अमेरिकन सैन्याने शनिवारी इस्रायलच्या दिशेने जाणार इराणच ड्रोन पाडलं होतं. किती ड्रोन पाडली त्याचा अचूक खुलासा करु शकत नाही, असं तीन अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने सांगितलं की, एक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर अनेक ड्रोन्स, मिसाइल डागले.

अजून कुठल्या देशांनी एअर स्पेस बंद केली?

तणाव संपला असं अजून आपण म्हणू शकत नाही. इराणने बरीच बॅलिस्टिक मिसाइल्स सुद्धा डागल्याचा IDF ला संशय आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलच नाही, लेबनान आणि जॉर्डनने सुद्धा आपला एअर स्पेस पूर्णपणे बंद केला आहे.