इराणला काहीही करुन इस्रायलला प्रत्युत्तर द्यायचं आहे. इराण बदला घेण्यासाठी आतल्या आत तडफडत आहे. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह खामेनेई यांनी इस्रायल विरुद्ध कारवाई करण्याची घोषणा केली आहे. इराणचे बॅलेस्टिक मिसाइल प्लॅटफॉर्म हल्ल्यासाठी स्ट्रॅटेजिक लोकेशन्सवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायलवर आता मोठे हल्ले केले जातील, असं IRGC कमांडरने सांगितलय. तिथे इस्रायलने सुद्धा घोषणा केली आहे, इराणला अण्वस्त्र संपन्न देश बनण्यापासून रोखणं हे आपलं लक्ष्य आहे. पुढचा हल्ला केल्यास इराण इस्रायलमधल्या कुठल्या ठिकाणांना टार्गेट करु शकतो? इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम नष्ट करण्याचा इस्रायलकडे काय प्लान आहे? हे समजून घेऊया.
इराणच्या टार्गेटवर भूमध्य सागरातील इस्रायलचे ऑईल आणि नेचुरल गॅस फिल्ड असू शकतात. यात पहिला नोआ-1 आहे. हा इस्रायलचा नॅचुरल गॅस रिज आहे. हे गॅस रिज इस्रायलच किनारपट्टीवर शहर अश्केलोनपासून 40 किलोमीटर लांब आहे. इस्रायल इथून 1999 पासून गॅस काढत आहे. इराणच दुसर टार्गेट असू शकतं मारी-B. हा सुद्धा इस्रायलचा नॅचुरल गॅस रिज आहे. इस्रायलचा हा गॅस रिज भू मध्य सागरात नोआ-वनपासून 15km पुढे आहे. या फील्डमध्ये 45 बिलियन क्यूबिक मीटर गॅस भंडार आहे. इस्रायलच पेट्रोलियम मंत्रालय इथून 2004 पासून गॅस काढत आहे.
इराणच तिसरं टार्गेट काय?
तमार गॅस फील्ड इराणच तिसरं टार्गेट असू शकतं. हा सुद्धा नॅचुरल गॅस रिज आहे. हा रिज इस्रायलच्या हायफा शहरापासून 90 किलोमीटर लांब भूमध्य सागरात आहे. इथून सुद्धा 1999 पासून गॅस काढला जातोय.
इराणच इस्रायलमधील चौथ टार्गेट काय असेल?
इराणच चौथ टार्गेट असू शकतं, लेवियाथन गॅस फिल्ड. हा सुद्धा इस्रायलचा नॅचुरल गॅस रिज आहे. हा तमार गॅस रिजपासून पश्चिमेला 30 किलोमीटर पुढे आहे. 810 बिलियन क्यूबिक मीटरच इस्रायलच हे सर्वात मोठं गॅस फिल्ड आहे.
त्याशिवाय अजून कुठे हल्ला होईल?
त्याशिवाय इराणकडून कारिश, तापिन आणि डॉल्फिन ऑईल, गॅस रिजवर सुद्धा मिसाइल हल्ला होऊ शकतो. इस्रायलचे हे गॅस आणि ऑईल रिज एफ्रोडाइट नॅचुरल फील्डमध्ये आहेत.