Iran-Israel War Impact : इराण-इस्रायल संघर्ष युद्धात बदलला तर भारताचं काय नुकसान होईल?

| Updated on: Oct 02, 2024 | 10:49 AM

Iran-Israel War Impact : इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यामुळे टेन्शन वाढलं आहे. दोन्ही देशांसोबत भारताचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे दोन्ही देश भारतावर किती प्रमाणत आणि भारत त्यांच्यावर किती प्रमाणात अवलंबून आहे ते जाणून घ्या. हा संघर्ष युद्धात बदलला तर भारताच काय नुकसान होईल?

Iran-Israel War Impact : इराण-इस्रायल संघर्ष युद्धात बदलला तर भारताचं काय नुकसान होईल?
Iran israel tension war
Follow us on

Iran-Israel War Impact : इराण-इस्रायलमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यामुळे मिडिल ईस्टमध्ये टेन्शन वाढलं आहे. दोन्ही देशांसोबत भारताचे चांगले व्यापारिक संबंध आहेत. तणाव वाढल्यामुळे भारताने चिंता व्यक्त केलीय. हा संघर्ष युद्धात बदलला, तर बाजाराच्या चिंताही वाढतील. इराण आणि इस्रायलवर भारत मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताचे दोन्ही देशांसोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ही लढाई नको अशीच भारताची भूमिका आहे. हा संघर्ष उद्या युद्धामध्ये बदलला, तर भारताच काय नुकसान होईल, ते जाणून घ्या. सर्वप्रथम हे जाणून घेऊया, भारताचे इस्रायलसोबत कसे संबंध आहेत? मागच्या काही वर्षात दोन्ही देशांमध्ये किती व्यापार झालाय?

भारताने 1992 साली इस्रायलसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढतच गेला. 1992 साली 20 कोटी डॉलरचा असणारा व्यापार FY 2022-23 मध्ये 10.7 अब्ज डॉलरपर्यंत जाऊन पोहोचलाय. मागच्या चार वर्षात हा व्यापार आणखी वाढलाय. व्यापार दुप्पट झालाय. 2018-19 मध्ये 5.56 अब्ज डॉलर असणारा व्यापार 2022-23 मध्ये 10.7 अब्ड डॉलर पर्यंत पोहोचला. 2021-22 आणि 2022-23 मध्ये व्यापारात 36.90 टक्के वाढ झाली. 7.87 अब्ज डॉलरवरुन 10.77 अब्ज डॉलर पर्यंत व्यापार वाढला.

भारताकडून इस्रायलला कोणत्या वस्तू निर्यात होतात?

भारताकडून इस्रायलला डीजेल, हीरे, विमान टरबाइन इंधन, रडार उपकरण, बासमती तांदूळ, टी-शर्ट आणि गहू या वस्तू निर्यात केल्या जातात. 2022-23 मध्ये निर्यातीत डिजेल आणि हिऱ्याचा हिस्सा 78 टक्के होता. भारताने इस्रायलकडून, पोटेशियम क्लोराइड, मेकॅनिकल एप्लायंस, थ्रस्टचे टर्बो जेट आणि प्रिंटेड सर्किट सारख्या वस्तू आयात केल्या.

इराण बरोबर व्यापार वाढला की कमी झाला?

एकाबाजूला भारताचा इस्रायल बरोबर व्यापार वाढलाय. त्याचवेळी मागच्या पाच वर्षात भारत-इराणमध्ये व्यापार मुल्य कमी झालय. आर्थिक वर्ष 2022-23 इराण भारताचा 59वां सर्वात मोठा व्यापारिक भागीदार होता. द्विपक्षीय व्यापार 2.33 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेला. मागच्या तीन वर्षात (2019-20, 2020-21 और 2021-22) मध्ये इराणवरील अमेरिकेच्या प्रतिबंधामुळे भारताचा व्यापार कमी होत गेला. 2018-19 मध्ये 17 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेला व्यापार कमी होऊन 2019-20 मध्ये 4.77 अब्ज डॉलर आणि 2020-21 मध्ये 2.11 अब्ज डॉलर पर्यंत कमी झाला.

भारत इराणला कुठल्या वस्तूंची निर्यात करतो?

2022-23 मध्ये 2.33 अब्ड डॉलरच्या व्यापारात भारताकडून इराणला 1.66 अरब डॉलरच्या सामानाची निर्यात झाली. तेच इराणकडून भारताने फक्त 0.67 अब्ज डॉलरची आयात केली. भारत इराणला प्रामुख्याने कृषी वस्तु आणि पशुधन उत्पादनांची निर्यात करताो. यात मीट, स्किम्ड मिल्क, ताक, घी, कांदा, लसूण आणि डब्बाबंद भाज्या आहेत. भारत इराणकडून मिथाइल अल्कोहल, पेट्रोलियम बिटुमेन, लिक्विफाइड ब्यूटेन, फळं, लिक्विफाइड प्रोपेन, खजूर आणि बादामाची आयात करतो.

भारतावर काय होणार परिणाम?

इराणच्या इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आखाती देशात कच्चा तेलाची ब्रेंट क्रूड ऑईल आणि अमेरिकी कच्चं तेल डब्ल्यूटीआयची किंमत 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर प्रति बॅरल 74 डॉलरपर्यंत पोहोचलाय. तेल महागल्यास भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. कच्चा तेलाच्या तेजीमुळे ऑईल एक्सप्लोरेशन कंपनी ओएनजीसी आणि इंडियन ऑईलच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. तेच पेंट आणि टायर शेअर्समध्ये घसरण होऊ शकते.