इस्त्रायल आणि हमास युद्धाचे ढग अजून निवळले नाही. तोच गेल्या आठवड्यापासून इराण आणि इस्त्रायल युद्धाचे ढग दाटले होते. अखेर इराणने त्याची सुरुवात केली. रमजान महिना संपल्यानंतर इराणने इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्र डागले डागले. त्यानंतर आता इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्करी अधिकारी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. तसेच देशाला संबोधित करताना त्यांना आमचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही? जोरदार उत्तर देऊ, अशी घोषणा केली आहे. यामुळे इराणने युद्धविरामची घोषणा केली असली तरी इस्त्रायल आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, “इस्रायलच्या नागरिकांनो, आमची संरक्षण यंत्रणा तैनात आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही संरक्षण आणि आक्रमक दोन्हीसाठी सज्ज आहोत. इस्रायल मजबूत आहे. IDF मजबूत आहे आणि आमची जनताही मजबूत आहे. आम्ही अमेरिकेच्या भूमिकेचे कौतुक करतो. इस्रायलसह, तसेच ब्रिटन, फ्रान्स आणि इतर अनेक देशांचा पाठिंबा आम्हाला मिळाला आहे.
नेतन्याहू म्हणाले, आमचे धोरण स्पष्ट आहे. जो कोणी आमचे नुकसान करेल, त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही कोणत्याही धोक्यापासून स्वतःचा बचाव करू. आम्ही एकत्र उभे राहू आणि आमच्या सर्व शत्रूंवर मात करू. इस्रायलमधील नागरिकांना IDF होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. ”
इराणच्या हल्ल्याचे पडसाद आता जगभर उमटण्यास सुरुवात झाली आहे. जॉर्डनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इस्त्रायलने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.
इस्त्रायल
इस्त्रायल