तेहरान: अजरबैजान (Azerbaijan) आणि इराणमधला (Iran) तणाव पुन्हा एकदा वाढला आहे, त्याला कारण ठरतोय इराणने अजरबैजानच्या सीमेवर सुरु केलेला युद्ध सराव. (Iran Military Drills) अझरबैजानसोबत वाढत्या तणावादरम्यान, इराणच्या सैन्याने (Iran Army) देशाच्या उत्तर-पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर युद्ध सराव सुरु केला आहे. या युद्ध सरावात ड्रोन, लष्करी वाहनं आणि हेलिकॉप्टरचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी, इराणी लष्कराच्या ग्राउंड फोर्सने ‘फतेहा’ नावाचा हा लष्करी सराव सुरू केला. ब्रिगेडियर जनरल किओमार्स हैदरी (Kiomars Heidari) यांनी इराणी वृत्तसंस्थांना सांगितलं की, शस्त्रे, लष्करी उपकरणं आणि युद्ध सज्जतेचे परीक्षण करण्यासाठी हा सराव केला जात आहे. (iran-kicks-off-military-exercise-amid-rising-tensions-with-azerbaijan-and-alleged-israel-presence)
ब्रिगेडियर म्हणाले की, या सरावामुळे सीमेवर तैनात सशस्त्र दलांची तयारी होईल. शिवाय, हा सराव सुनियोजत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सरावात आर्मी ग्राउंड फोर्स डिव्हिजनमधील लष्करी युनिट, तोफखाना आणि ड्रोन यांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सपोर्ट दिला. लष्करी सरावाचे फोटो पत्रकार हेशमत अलावी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. ते म्हणाले की, अझरबैजानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानने हा युद्ध सराव आयोजित केला आहे. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी अभ्यास आहे. याआधी गुरुवारी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, त्या व्हिडीओ फुटेजमध्ये लष्करी सरावापूर्वी इराणी सुरक्षा दल एकत्र जमल्याचं दिसतं आहे.
#Iran‘s military drills near border with #Azerbaycan underway .Tension increases between both countries however chances of direct conflict is very low pic.twitter.com/mqabNGGeKv
— Himat (@Himat75) September 30, 2021
अजरबैजानाच्या नावाखाली इस्रायलला टक्कर
इराणच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेला माहितीनुसार, हा पूर्वनियोजित सराव आहे, यामागे कुठलाही उद्देश नाही. मात्र, इतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अजरबैजानशी संबंध बिघडल्यामुळे हा सराव केला जात आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ग्राऊंड फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद पाकपौर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, इराण बाजूच्या देशाला ज्यू सरकारचा हस्तक्षेप आणि विरोध गटांचा स्वर्ग बनू देऊ शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतेबजादेह म्हणाले की, तेहरान त्याच्या सीमेजवळ “ज्यू राजवटी” ची उपस्थिती सहन करणार नाही. खरं पाहिलं तर त्यांचा इशारा हा इस्रायलकडे आहे.
Oct 1—Northwest #Iran
Footage of the regime’s armed forces beginning one of their largest ever military drills near borders with #Azerbaijan as tensions continue to escalate in this area of the region. pic.twitter.com/5Fz3V4JPoN— Heshmat Alavi (@HeshmatAlavi) October 1, 2021
अजरबैजानची याबाबत काय भूमिका?
अजरबैजानचे राष्ट्राध्यक्ष अल्हम अलियेव यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तुर्कीच्या एका वृत्तसंस्थेला माहिती देताना ते म्हणाले की, आम्हाला या युद्धसराव पाहून आश्चर्य वाटलं, कारण गेल्या 30 वर्षांत कधीही असं घडलेलं नाही. पुढं ते म्हणाले की, खरंच हा युद्धसरावच आहे का? बरं असेल तर तो आमच्या सीमेवरच का? असे प्रश्न आता अजरबैजानचे नागरिक विचारत आहेत. अजरबैजान आणि इस्रायलचे संबंध अलिकडच्या काळात सुधारले आहेत, अजरबैजान इस्रायलला कच्चं तेल पुरवतो त्याबदल्यात इस्रायलकडून शस्रसाठा पुरवला जातो.
हेही वाचा: