इराणः Iran Navy Largest Ship Sunk After Fire : इराण नौसेनेचे सर्वात मोठे जहाज बुधवारी आग लागल्यानंतर बुडालेय. ओमानच्या आखाती देशातील या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. इराणची अर्ध सरकारी वृत्तसंस्था फार्स आणि तस्निम यांनी ही माहिती दिली. खरग नावाच्या या जहाजाला वाचविण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते बुडाले. (Iran Navy Largest Ship Sunk In Gul Of Oman After Fire)
इराणचे मुख्य तेल टर्मिनल असलेल्या खर्ग आयलँडच्या नावावर या जहाजाचे नाव ठेवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजता या जहाजात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्नांना यश आले नाही. हे जहाज इराणच्या जस्क (Jask)बंदराजवळ बुडाले. हे बंदर तेहरानपासून सुमारे 1270 किलोमीटर अंतरावर आहे. हा अपघात पर्शियन गल्फमधील अरुंद रस्ता होरमुझच्या सामुद्रधुनीजवळ झालाय.
या जहाजाची छायाचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. यात जॅकेट घातलेले जहाजाचे चालक दल जहाजावरून पाण्यात उडी मारून पोहून जीव वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने त्याला ट्रेनिंग शिप म्हटले आहे. चित्र आणि व्हिडीओंमध्ये जहाजातून धूर येत असल्याचे दिसून येते.
अमेरिकेच्या नॅशनल ओसियेनिक अँड एटमसफेरिक एडमिनिस्ट्रेशनने अंतराळातील उपग्रहाच्या माध्यमातून जहाजावरील आगीचा अंदाज घेण्यात आला होता. इराणी माध्यमांना हे कळविण्यापूर्वी त्यांनी याची माहिती दिली होती.
BREAKING ? Largest ship in the Iran’s navy “Kharg” caught fire and sank in the Gulf of Oman pic.twitter.com/Rs5oZUI3B0
— Insider Paper (@TheInsiderPaper) June 2, 2021
हे जहाज इराणच्या नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यास सक्षम होते. अवजड माल उचलण्यास सक्षम असलेल्या या जहाजातून हेलिकॉप्टरदेखील प्रक्षेपित केले जाऊ शकत होते. हे जहाज 1977 मध्ये यूकेमध्ये बांधले गेले होते आणि 1984 मध्ये नौदलात सामील झाले. यासाठी इराणला बरीच मेहनत घ्यावी लागली. सुमारे पाच वर्षे चर्चा झाल्यानंतर इराणला हे जहाज मिळाले. या आगीमागील कारणांबद्दल इराणकडून कोणतेही विधान आलेले नाही. वर्ष 2019 पासून ओमानच्या आखातामध्ये अशा प्रकारच्या संशयास्पद घटना घडत आहेत. अमेरिकन नौदलाने नंतर आरोप केला की, इराण त्यांच्या जहाजांना लक्ष्य करीत आहे.
संबंधित बातम्या
अमेरिकेनं 110 कोटी डॉलर्समध्ये इराणचे 20 लाख बॅरल कच्चे तेल विकले, UAEकडून जप्त केला टँकर
एक मासा जाळ्यात अडकला, मच्छीमार झटक्यात लखपती बनला, वाचा नेमकं काय घडलं?
Iran Navy Largest Ship Sunk In Gul Of Oman After Fire