AIR STRIKE चा बदला दहशतवादी हल्ल्याने, पाकिस्तान सीमेवर इराणी सैन्यातील मोठ्या अधिकाऱ्याची हत्या

| Updated on: Jan 18, 2024 | 9:41 AM

Iran Pakistan Tension | इराणच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान खवळला आहे. पाकिस्तानने बदला घेण्यासाठी दहशतवादी कृत्याचा आधार घेतला. पाकिस्तानने हवाई हल्ल्यानंतर इराणला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती.

AIR STRIKE चा बदला दहशतवादी हल्ल्याने, पाकिस्तान सीमेवर इराणी सैन्यातील मोठ्या अधिकाऱ्याची हत्या
iran airstrike in pakistan
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लाहोर : इराणने पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात घुसून एअर स्ट्राइक केला. जैश अल अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर हवाई हल्ला केला. पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याद्वारे या कारवाईचा बदला घेतला आहे. पाकिस्तानने इराणी सैन्याच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं. इराण रिवोल्यूशनरी गार्ड्सच्या एका अधिकाऱ्याची पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर गोळी झाडून हत्या करण्यात आली. पाकिस्तानने हवाई हल्ल्यानंतर इराणला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. आता इराणी सैन्य अधिकाऱ्याची हत्या याकडे बदल्याची कारवाई म्हणून पाहिलं जात आहे.

हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा इराणकडून सांगण्यात आलं. त्याआधी पाकिस्तानने इराणमधून आपल्या राजदूताला माघारी बोलवून घेतलं. इराणने जाहीरपणे पाकिस्तानच्या संप्रभुतेच उल्लंघन केलय. हे आंतराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्राच्या चार्टर सिद्धांताच उल्लंघन आहे, असं पाकिस्तानने म्हटलं होतं.

इराणी सैन्य अधिकाऱ्याच्या हत्येमागे कोण?

जैश अल अदल ही दहशतवादी संघटना पाकिस्तान-इराण सीमेवर सक्रीय आहे. त्यांनी याआधी इराणच्या सुरक्षा पथकांना लक्ष्य केलं होतं. आता इराणी सैन्य अधिकाऱ्याच्या हत्येमागे जैश अल अदल संघटनेवरच संशय आहे. जैश अल अदलने इराणवर हल्ल्यासाठी नेहमीच पाकिस्तानी भूमीचा वापर केलाय. इराणने या बद्दल वारंवार इशारा दिला. पण पाकिस्तानने काही कारवाई केली नाही. अखेर इराणने एअर स्ट्राइकच पाऊल उचललं. पाकिस्तानी एअर फोर्सने पूर्व इराणच्या सरवन शहरात बलूच दहशतवादी संघटनेच्या तळावर एअर स्ट्राइक करुन या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं.