Ibrahim Raisi Death : रईसी यांचं हेलिकॉप्टर शूट डाऊन का? तपास समितीचा पहिला रिपोर्ट् आला समोर

| Updated on: May 24, 2024 | 9:27 AM

Ibrahim Raisi Death : इब्राहिम रईसी यांचा सोमवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. रविवार दुपारपासून त्यांच्या हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. त्यांच्या अकाली मृत्यूवरुन विविध अंदाज लावले जात होते. आता इराणच्या आर्म फोर्स जनरल स्टाफचा एक रिपोर्ट समोर आलाय.

Ibrahim Raisi Death : रईसी यांचं हेलिकॉप्टर शूट डाऊन का? तपास समितीचा पहिला रिपोर्ट् आला समोर
iran president ibrahim raisi death in helicopter crash
Follow us on

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूवरुन विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते रईसी यांचा मृत्यू हा इस्रायलच्या एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे. काहीजण त्यांच्या मृत्यूमागे इराणचे राज्यकर्तेच असल्याच म्हणत आहेत. रईसी यांच्या हेलिकॉप्टरला जो अपघात झाला, त्या संदर्भात आता इराणच्या आर्म फोर्स जनरल स्टाफचा एक रिपोर्ट समोर आलाय. कमिटीने आपल्या रिपोर्ट्मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना का घडली? क्रॅश होण्यामागे काय कारणं आहेत? त्याचा खुलासा केला आहे. रिपोर्ट्नुसार इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर त्याच मार्गावरुन चाललेलं, जो पहिल्यापासून निश्चित होता. म्हणजे हेलिकॉप्टर भरकटल नव्हतं.

त्याशिवाय रिपोर्ट्मध्ये हे सुद्धा म्हटलय की, हेलिकॉप्टरचा पायलट दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलटशी संपर्कात होता. सुरुवातीच्या तपासात रईसी यांचं हेलिकॉप्टर शूट डाऊन केल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. इराणी ड्रोनने हेलिकॉप्टरच लोकेशन शोधून काढलं, असं कमिटीने म्हटलं आहे. दाट धुकं आणि खराब हवामानामुळे सर्च ऑपरेशन सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होतं. हेलिकॉप्टर क्रॅश होताना डोंगराच्या कड्याला धडकलं. त्यानंतर त्यात आग लागली. हा अपघात कुठल्या कारस्थानाचा भाग होता, असा कुठलाही पुरावा सापडलेला नाही. सध्या प्राथमिक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. फायनल रिपोर्ट द्यायला कमिटीला थोडावेळ लागेल असं सुद्धा म्हटलं आहे.

3 दिवसात पहिला अहवाल सादर

ISNA च्या रिपोर्टनुसार, सोमवारी राष्ट्रपती आणि अन्य व्यक्तींच्या मृत्यूनंतर तात्काळ इरानी चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांनी चौकशीचे आदेश दिले. रईसी यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशच्या तपासासाठी हाय रँकिंग कमिटीची स्थापना करण्यात आली होती. 3 दिवसात या कमिटीने आपला पहिला अहवाल सादर केला.

जगाचा नकाशा बदलून टाकण्याची धमकी

रईसी यांच्या मृत्यूनंतर इराणी आणि त्यांच्या समर्थक गटांनी यामध्ये कुठलं कारस्थान असेल, तर जगाचा नकाशा बदलून टाकू अशी धमकी दिली होती. या दुर्घटनेशी आमचा काहीही संबंध नाही, असं इराणने म्हटलं होतं.