Ali Khamenei : ‘तरच अल्लाह…’, इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 04, 2024 | 2:45 PM

Ali Khamenei : "आम्ही घाईगडबड करणार नाही. पण थांबणार सुद्धा नाही. आम्ही आपली जबाबदारी निभावणार. आम्ही लेबनान सोबत आहोत. गरज पडली, तर पुन्हा हल्ला करु. सैन्य त्यांच्या हिशोबाने निर्णय घेईल" असं अयातुल्लाह अली खामेनेई म्हणाले.

Ali Khamenei : तरच अल्लाह..., इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईची पहिली प्रतिक्रिया
iran supreme leader Ali Khamenei
Image Credit source: IRNA
Follow us on

हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहसाठी तेहरानच्या ग्रँड मशिदीत नमाज अदा करण्यात आली. यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई सहभागी झाले होते. नमाज अदा केल्यानंतर खामेनेई यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या दरम्यान हसन नसरल्लाहला सुपुर्द-ए-खाक केलं जाईल. अयातुल्लाह अली खामेनेई यांनी धर्माच कार्ड खेळलं आहे. त्यांनी जगातील सर्व मुस्लिमांना एकजूट होण्याच आवाहन केलं आहे. मुस्लिम एकत्र राहिले, तर अल्लाह मेहरबान राहील असं त्यांनी म्हटलं आहे. ‘अल्लाहने जो मार्ग दाखवलाय, त्यावर मुस्लिमांनी चाललं पाहिजे’ असं खामेनेई म्हणाले. “कुराणात म्हटलय की, मुस्लिमांनी एकत्र राहीलं पाहिजे. मुस्लिम विरोधक विनाशाच राजकारण करत आहेत. मुस्लिमांना आपल्या शत्रुंपासून सावध राहिलं पाहिजे” अस अयातुल्लाह अली खामेनेई म्हणाले.

तेहरानमध्ये नमाज अदा केल्यानंतर ते बोलत होते. “शत्रु मुस्लिम देशांच्या मागे लागला आहे. आपल्याला आपल्या जमिनीची रक्षा करावी लागेल. ते आपल्या भूमीत कसे आले?” असा सवाल खामेनेई यांनी उपस्थित केला. अफगाणिस्तानपासून लेबनानपर्यंत त्यांनी सर्व मुस्लिमांना एकजूट होण्याच आवाहन केलं. “पॅलेस्टाइनला शत्रुने उद्धवस्त केलय. गाजामध्ये जे झालं, ते आपण सर्वांनी पाहिलं. आंतरराष्ट्रीय कायदेसुद्ध पॅलेस्टाइनच्या अधिकाराच्या बाजूने होते. पॅलेस्टाइनच्या हक्कासाठी इस्रायलवर हल्ला केला. गरज पडली, तर पुन्हा हल्ला करु” असं अयातुल्लाह अली खामेनेई यांनी म्हटलं आहे.

पुन्हा हल्ला करु, खामेनेईची धमकी

“खामेनेई यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला योग्य ठरवलं. आम्ही घाईगडबड करणार नाही. पण थांबणार सुद्धा नाही. आम्ही आपली जबाबदारी निभावणार. आम्ही लेबनान सोबत आहोत. गरज पडली, तर पुन्हा हल्ला करु. सैन्य त्यांच्या हिशोबाने निर्णय घेईल” असं खामेनेई म्हणाले. इराणी सैनिकांच्या शौर्यावर संपूर्ण देशाला गर्व आहे असं इराणचे सुप्रीम कमांडर खामेनेई म्हणाले. हसन नसरल्लाह शहीद झालाय. लढाईसाठी आपल्याला तयार रहावं लागेल. शत्रुला नसरल्लाहच्या शहीद होण्याची भिती वाटली पाहिजे. आम्ही आपल्या हक्काची लढाई लढतोय. इराणच्या संवेदना लेबनानसोबत आहेत असं ते म्हणाले. खामेनई यांनी नसरल्लाहला श्रद्धांजली वाहिली.