घरी आलेल्या पाहुण्याच्या हत्येचा इराण बदला घेणार, मुख्य मशिदीवर लावला ‘लाल ध्वज’

| Updated on: Jul 31, 2024 | 7:00 PM

इस्रायलने हमासचा प्रमुख इस्माईल हनियेला हवाई हल्ल्यात ठार केले आहे. आता याचा बदला घेण्याचा इशारा इराणने इस्रायला दिला आहे. इराणने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. इराणच्या कोम शहरात असलेल्या मशिदीच्या घुमटावर लाल ध्वज लावण्यात आला आहे, जो सूडाची भावना दर्शवतो. का लावला जातो हा लाल ध्वज जाणून घ्या.

घरी आलेल्या पाहुण्याच्या हत्येचा इराण बदला घेणार, मुख्य मशिदीवर लावला लाल ध्वज
Follow us on

हमासचे प्रमुख इस्माईल हनियाच्या हत्येनंतर जगात एकच खळबळ उडाली आहे. इराणमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी ते इराणमध्ये पोहोचले होते. यादरम्यान रात्री २ वाजता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.ज्यामध्ये इस्माईल सह त्यांच्या एका अंगरक्षकाचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. इराणच्या लोकांनी मशीदीवर लाल झेंडा लावला आहे. हा लाल झेंडा बदला घेण्याच्या उद्देशाने लावला जातो. जो आता वाढत्या संघर्षांचे संकेत देत आहे.

हत्येच्या काही वेळेआधीच इस्माईल हनिया यांनी इराणमधील मोठे नेते आयतुल्लाह यांची भेट घेतली होती.इराणच्या इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्डने देखील या हत्येची निंदा केली असून बदला घेतला जाईल असे म्हटले आहे.

रिवॉल्युशनरी गार्डने म्हटले की,हनिया यांची हत्या गाझामधील लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आली. इस्रायलने गाझामध्ये अनेक लहान मुले आणि महिलांना जखमी केले. इस्रायल आधुनिक शस्त्रांचा वापर करुन हमासच्या नेत्यांना लक्ष्य करतोय. तरी देखील तो हमासला मिटवू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे.

इराणच्या तेहरानमध्ये हनिया यांची अंतयात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह कतारला पाठवला जाणार असून तेथेच दफण केला जाणार आहे. इराणमध्ये मशीदीवर लाल झेंडा नेहमी लावला जातो. शहीदांची आठवण, मोहरमला देखील तो लावला जातो. या झेंडावर अरबी भाषेत या ला थारत अल हुसैन असं लिहिलं आहे. ज्याचा अर्थ ऐ हुसैनचा बदला घेणाऱ्यांनो असा होता.

लाल ध्वजांचा अर्थ काय आहे?

जमकरन मशीद इराणची राजधानी तेहरानपासून १२० किलोमीटर अंतरावर कोम शहरात आहे. इराणमधील हे पवित्र शहर मानले जाते. इराणचे शिक्षण केंद्र देखील आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी 1989 मध्ये सत्तेवर आल्यानंतर इराणमध्ये या मशिदीला महत्त्व दिले जाते. जामकरन मशिदीचा गेल्या 30-35 वर्षांमध्ये लक्षणीय विस्तार झाला आहे आणि आता पाच घुमट आहेत, जे शिया इस्लाममध्ये व्यावहारिकरित्या अनुपस्थित आहेत, जेथे मशिदींना सहसा फक्त एक घुमट असतो.