इस्रायलने हिज्बुल्लाह विरोधातील लढाई अधिक तीव्र केली आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच काल संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण झालं. या भाषणानंतर साधारण तासाभराने इस्रायलने बेरुतवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याने लेबनानच्या राजधानीला हादरवून सोडलय. IDF ने 60 बंकरविरोधी रॉकेटने हिज्बुल्लाहच्या मुख्यालयाला टार्गेट केलं. हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडरला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असं इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं. रॉयटर्सने हे वृत्त दिलय. या हल्ल्यात हिज्बुल्लाह चीफ नसरल्लाह मारला गेला की नाही? या बद्दल आत्ताच काही बोलणं घाईच ठरेल. या हल्ल्यात हिज्बुल्लाहच्या हेडक्वार्टरमध्ये उपस्थित कोणी जिवंत राहिलेलं नाही असं इस्रायली सैन्याच म्हणणं आहे. हल्ल्यात नसरल्लाह, त्याची मुलगी आणि भाऊ हाशिमचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय.
नसरल्लाह जिवंत आहे, असं हिज्बुल्लाहच्या जवळच्या सूत्राने रॉयटर्सला सांगितलं. इराणी तस्नीम वृत्त संस्थेने सुद्धा नसरल्लाह सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. एका वरिष्ठ इराणी सुरक्षा अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं की, ‘तेहरान सुद्धा हिज्बुल्लाह चीफबाबत माहिती घेत आहे’ बेरुतच्या दक्षिणी उपनगरात इस्रायली हल्ल्यानंतर हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहची संपर्क होऊ शकलेला नाही असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. हल्ल्याच्या काही तासानंतर नसरल्लाहच कोणतही वक्तव्य आलेलं नाही. इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलय की, नसरल्लाह जिवंत असेल, तर लगेच त्याची माहिती मिळेल. पण तो, मारला गेला असेल तर त्याची पृष्टी व्हायला काही वेळ लागेल.
हसन नसरल्लाहने कधी हिज्बुल्लाहच नेतृत्व हाती घेतलं?
हसन नसरल्लाहने 1992 साली हिज्बुल्लाहच नेतृत्व हाती घेतलं होतं. त्यावेली तो अवघ्या 35 वर्षांचा होता. असं म्हटलं जातं की, 1982 मध्ये इराणच्या रिवोल्युशनरी गार्ड्सने इस्रायल विरोधात लढण्यासाठी हिज्बुल्लाहची स्थापना केली होती. 90 च्या दशकात नसरल्लाह या संघटनेचा मोठा चेहरा बनला होता. याआधीचा हिजबुल्लाह चीफ सैय्यद अब्बास अल-मुसावीला इस्रायलने एका हेलिकॉप्टर हल्ल्यात संपवलं होतं.