Blast in Iran | दोन दिवसांपूर्वी इराण शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरलं. इराणचे टॉप जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. बुधवारी झालेल्या या बॉम्बस्फोटात 200 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला. कासिम सुलेमानी यांचा स्मृतीदिन असल्याने इराणी नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळाजवळ जमले होते. त्यावेळी हे शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोटानंतर लगेच संशयाची सुई इस्रायलकडे वळली. कारण सध्या इराण आणि इस्रायलमध्ये प्रचंड तणाव आहे. गाजा पट्टीत इस्रयालने हमास विरोधात युद्धा पुकारल आहे. इराणने पोसलेल्या हमासने 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये घुसून तिथल्या जनतेवर क्रूर अत्याचार केले. त्यामुळे इस्रायलने हमास विरोधात युद्ध पुकारल. त्यावेळी युद्ध रोखण्यासाठी इराणने इस्रायलला अनेकदा धमकी दिली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. दोन्ही देशातील तणावामुळे इराणमध्ये दोन बॉम्बस्फोट झाल्यानंतर संशयाची सुई इस्रायलकडे वळण स्वाभाविक होतं.
आता इराणमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी एका संघटनेने स्वीकारली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक एंड सीरिया म्हणजे ISIS ची एंट्री झाली आहे. ISIS या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली आहे. यामागे इसिसचा हात असू शकतो अशी शक्यता अमेरिकेने व्यक्त केली होती. अमेरिकेची ती भविष्यवाणी खरी ठरलीय.
दोन भावांचा मिळून मोठा हल्ला
इराण या हल्ल्यासाठी आतापर्यंत अमेरिका आणि इस्रायलला दोषी ठरवत होतं. युरोपियन युनियनसह काही देशांनी हा दहशतवादी हल्ला असल्याच म्हटलं होतं. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. ISIS ची मीडिया विंग अल फुरकानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन भावांनी मिळून हल्ला केल्याची माहिती आहे.
त्यांच्या मते ते काफीर आहेत
ISIS च्या मते शिया संप्रदायावर विश्वास ठेवणारे लोक काफीर आहेत. इसिसने याआधी सुद्धा शिया समुदायाची तीर्थक्षेत्र आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य केलय. हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतलीय, पण त्यांनी हल्ल्याबद्दल विस्ताराने माहिती देणं टाळलय. इराणी मीडियाने हल्ल्या संदर्भात जी माहिती दिलीय, ती ISIS पेक्षा वेगळी आहे. इराण या मुद्यावर अजून काही बोललेला नाहीय.