एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने सीरियामधील इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला. यात इराणचे 2 कमांडर आणि 7 अन्य व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने बदला घेण्याची घोषणा केली. इराणच्या या इशाऱ्यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईने अनेक देश धस्तावले आहेत. या धमकीच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या एअर लाइन्सने तेहरानसाठीची आपली सर्व उड्डाण रद्द केली आहेत. इराणने इस्रायलच्या एअर स्ट्राइक नंतर बदला घेण्याची धमकी दिलीय. त्यानंतर मिडिल ईस्टच्या सर्वच देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. ही स्थिती लक्षात घेऊन, जर्मनीच्या लुफ्थांसा एअरलाइन्सने तेहरानहून येणारी आणि तिथे जाणारी सर्व उ्डडाण रद्द केली आहेत. प्रवाशी आणि स्टाफची सुरक्षा सर्वोच्च आहे, असं एअर लाइन्सने या निर्णयाबद्दल सांगितलं. 6 एप्रिलपासून 11 एप्रिल पर्यंत सर्व उड्डाण रद्द केली आहेत.
इराणच्या न्यूज एजन्सीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक अरेबिक रिपोर्ट जारी केला, त्यानंतर हा तणाव आणखी वाढला. तेहरानच्या सर्व हवाई क्षेत्राला मिलिट्री ड्रीलसाठी बंद केलय, असं त्यात लिहिल होतं. एजन्सीने नंतर ती पोस्ट सुद्धा डिलीट केली. मिडिल ईस्ट शिवाय अमेरिकेनेही इराणच्या संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन हाय अलर्ट जारी केलाय. मिडिल ईस्टच्या स्थितीवर सतत लक्ष ठेऊन आहोत, असं लुफ्थांसा एअरलाइन्सने सांगितलं. लुफ्थांसा एअरलाइन्स आणि ऑस्ट्रियन एयरलाइन्स या दोनच हवाई कंपन्या तेहरानमधून आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सच संचालन करतात.
काय धमकी दिलीय?
1 एप्रिलला सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इस्रायलने इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला. यात 14 लोकांचा मृत्यू झाला. यात 7 सामन्य नागरिक होते. 2 इराणी कमांडर होते. इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सच्या परदेश विभागाचा प्रमुख कुद्स फोर्सचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद रजा जाहेदी ठार झाला. इराणचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मोहम्मद बघेरी यांनी मोहम्मद रजा जाहेदीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी बदला घेण्याची भाषा केली होती. आम्हाला बदला घ्यायचा आहे आणि बदला घेणार असं ते म्हणालेले. बदला कधी आणि कसा घ्यायचा? हे इराण ठरवेल, मोहम्मद बघेरी म्हणाले होते.