Israel Attack Hezbollah : इस्रायलच रक्षण करणारी 3 लेयर डिफेन्स सिस्टिम काय आहे? हिज्बुल्लाहच दोन्ही बाजूंनी मरण

| Updated on: Sep 28, 2024 | 10:39 AM

Israel Attack Hezbollah : इस्रायल एकापाठोपाठएक नियोजनबद्ध रितीने हिज्बुल्लाहवर वार करत आहे. नेमका प्रतिकार कसा करायचा? हेच हिज्बुल्लाहला कळत नाहीय. इस्रायलने हे सगळं इतकं पद्धतशीरपणे केलय की, ते किती पुढचा विचार करतात, त्यांची तयारी काय लेव्हलची आहे? हे त्यातून स्पष्ट झालय.

Israel Attack Hezbollah : इस्रायलच रक्षण करणारी 3 लेयर डिफेन्स सिस्टिम काय आहे? हिज्बुल्लाहच दोन्ही बाजूंनी मरण
israel attack hezbollah
Follow us on

इस्रायलने शुक्रवारी पुन्हा एकदा लेबनानवर हल्ला केला. हिज्बुल्लाहला टार्गेट केलं. इस्रायलने यावेळी हिज्बुल्लाहच्या मुख्यालयावर हल्ला केला. इस्रायल ज्या किलर मिसाइलने हिज्बुलालाहचा शेवट करतोय, ते खूप घातक आहे. हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. 76 जखमी झाले अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. इस्र्याल हिज्बुल्लाहला संपवण्यासाठी खूप शक्तीशाली मिसाइल्सचा वापर करत आहे.

AGM 114 R9X

हेलफायर R9X

निंजा मिसाइल आणि स्वॉर्ड बॉम्ब, याला ब्लेड मिसाइल सुद्धा म्हटलं जातं.

हेलफायर R9X ही अमेरिकेची सायलेंट पण खतरनाक मिसाइल आहे. हवेतून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या R9X मिसाइलमध्ये 6 धारदार ब्लेड आहेत. हे ब्लेड टार्गेटला संपवतात. या मिसाइलचा वापर पिन पॉइंट हल्ल्यासाठी केला जातो. R9X मिसाइल लक्ष्यभेद करण्यात तरबेज आहे.

या मिसाइलच वैशिष्ट्य काय?

या मिसाइलच वैशिष्ट्य हे आहे की, आस-पास विद्धवंस घडवत नाही. फक्त टार्गेटला संपवतं. या मिसाइलमध्ये विस्फोटक वॉरहेड नाहीय. या मिसाइलमुळे ना स्फोट होतं, ना स्फोटाचा आवाज. हे तेच मिसाइल आहे, ज्याचा वापर करुन अमेरिकेने अल-जवाहिरीला संपवलं होतं.

दोन्ही बाजुंनी हिज्बुल्लाहच मरणं

हिज्बुल्लाहची 70 टक्के सैन्य क्षमता संपवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. मात्र, तरीही हिज्बुल्लाह इस्रायलवर रॉकेट हल्ले करुन आपण सामर्थ्यवान असल्याच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हिज्बुल्लाह उत्तर इस्रायलच्या हायफा, साफेद, गोलन, किर्यात शिमोना या शहरांवर सतत रॉकेट हल्ले करत आहे. पण इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिम हिज्बुल्लाहचे हे रॉकेट्स हवेतच नष्ट करत आहे. हिज्बुल्लाहला इस्रायलमध्ये ना हल्ले करणं शक्य होतं आहे, ना हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करणं. दोन्ही बाजूंनी त्यांचं मरण झालय.

इस्रायलचा बचाव करणाऱ्या डिफेन्स सिस्टिमच्या तीन लेयर कुठल्या?

हिज्बुल्लाहच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इस्रायलने आपली पूर्ण डिफेन्स पावर उतरवली आहे. इस्रायली डिफेन्स सिस्टिमुळे हे हल्ले फेल होत आहेत. इस्रायलच्या तीन डिफेन्स सिस्टिम (डेविड स्लिंग, एरो 3 आणि आर्यन डोम) 24 तास कार्यरत आहेत.

आर्यन डोम शॉर्ट रेंज एयर डिफेंस सिस्टिम आहे. ही सिस्टिम हिजबुल्लाहचे रॉकेट हल्ले इंटरसेप्ट करत आहे. एरो 3 लॉन्ग रेंज डिफेंस सिस्टिम आहे. या सिस्टिमद्वारे बॅलेस्टिक मिसाइल्स इंटरसेप्ट केल्या जात आहेत. डेविड स्लिंग सुद्धा लॉन्ग रेंज एयर डिफेंस सिस्टिम आहे. या द्वारे बॅलेस्टिक आणि क्रूज मिसाइल्सना इंटरसेप्ट केलं जातय. इस्रायलने स्वत:च्या बचावासाठी ही तीन लेयरची डिफेन्स सिस्टिम तैनात केली आहे.