आमचे उद्दिष्ट पूर्ण…पण आता इराणने पुन्हा धाडस केल्यास…इस्रायलने इराणला पुन्हा धमकवले

| Updated on: Oct 26, 2024 | 3:31 PM

Israel Attack Iran : आयडीएफने इराणच्या अनेक सैनिक क्षेत्रावर हल्ले केले. त्यानंतर आमचे सर्व विमान सुरक्षित परत आले. आमचा उद्देश पूर्ण झाला. हा हल्ला इराणने काही दिवसांपूर्वी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यास उत्तर म्हणून करण्यात आला होता. 

आमचे उद्दिष्ट पूर्ण...पण आता इराणने पुन्हा धाडस केल्यास...इस्रायलने इराणला पुन्हा धमकवले
Israel Attack Iran
Follow us on

Israel Attack Iran : इस्त्रायल आणि हमास युद्धाची व्याप्ती वाढत आहेत. या युद्धात इराणने उडी घेतली. काही दिवसांपूर्वी इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. त्याचा सूड इस्त्रायलने शनिवारी पहाटे पूर्ण केला. इस्त्रायलने इराणच्या अनेक सैनिक ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे दोन सैनिक मारले गेले. या ऑपरेशनला इस्त्रायनले ‘ऑपरेशन डेज ऑफ रिपेंटेंस’ (पश्चात्तापाचे दिवस) असे नाव दिले.

इस्त्रायलने शनिवारी पहाटे अनेक इराणच्या अनेक शहरांवर रॉकेट हल्ले केले. इस्त्रायलने दावा केली की, या हल्ल्यात सामान्य नागरिकांना लक्ष न करता केवळ सैनिकी स्थळांवर हल्ले करण्यात आले. त्याला इस्त्रायलने पश्चात्तापाचा दिवस हे नाव दिले. यहूदी धर्मात ‘डेज ऑफ रिपेंटेंस’ चा वापर रोश हशाना आणि योम किप्पुर (Yom Kippur) दरम्यानच्या दहा दिवसांमध्ये केला जातो. त्याला पश्चात्तापाचे दहा दिवस म्हटले जाते. या काळात लोक आपल्या कर्मांचा विचार करुन त्यात सुधारणा आणण्याचा संकल्प करतात. तसेच सत्याचा मार्गावर येण्याचा प्रयत्न करतात.

आता इराणने पुन्हा साहस केल्यास…

आयडीएफने म्हटले आहे की, ‘जर इराणने इस्रायल आणि तेथील नागरिकांवर हल्ले सुरूच ठेवले तर त्याला त्याची किमत मोजावी लागले. इस्रायलला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आयडीएफकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जाते आणि संरक्षण आणि आक्रमण दोन्हीमध्ये समन्वय ठेवला जातो.

हे सुद्धा वाचा

आमचा उद्देश पूर्ण

इराणवरील हल्ल्याची माहिती देताना आयडीएफ प्रवक्ता म्हणाला, आयडीएफने इराणच्या अनेक सैनिक क्षेत्रावर हल्ले केले. त्यानंतर आमचे सर्व विमान सुरक्षित परत आले. आमचा उद्देश पूर्ण झाला. हा हल्ला इराणने काही दिवसांपूर्वी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यास उत्तर म्हणून करण्यात आला होता.

दरम्यान सौदी अरेबियाने इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. इराणच्या स्वातंत्र्यावर आणलेली हे संकट आहे. तसेच यामुळे इस्त्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा दावा सौदी अरेबियाने केला आहे.