Israel Destroy Iran Missile Production: इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा बदला इस्त्रायलने शनिवारी घेतला. इस्त्रायलने शनिवारी इराणावर जोरदार हल्ले केले. इस्त्रायलने या हल्ल्यात इराणाचे लष्करी तळांना लक्ष केले होते. इस्त्रायलचा हा अचूक ठरला. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युनिट उद्ध्वस्त झाले आहे.इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे क्षेपणास्त्र उत्पादन युनिट पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे इराणसाठी हा मोठा धक्का आहे.
इस्रायलीमधील सूत्रांनी सांगितले की, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरण्यात येणार घन इंधन तयार करण्यासाठी वापरलेले युनिट नष्ट केले आहे. इराणच्या क्षेपणास्त्र शस्त्रागाराचा हा मोठा भाग होता. हे मिक्सर अतिशय प्रगत आहे. ते इराण स्वतः बनवत नाहीत. ते चीनकडून खरेदी केली जातात. इराणने गेल्या काही वर्षांत मोठ्या किमतीत अनेक मिक्सर आयात केले आहेत. आता इस्रायलने सांगितले की त्यांचे हल्ले अचूक होते आणि त्याचे उद्दिष्ट साध्य झाले.
इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या क्षेपणास्त्र उपक्रमाचे मोठे नुकसान झाले आहे. इस्त्रायली हल्ल्यामुळे इराणची क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता नष्ट झाल्याची पुष्टी एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे. इस्त्रायलने हल्ल्यात इराणमधील लष्करी तळांना लक्ष केले. पॉवर प्लँटवर उद्ध्वस्थ केले. तसेच ऑईल रिफायनरीवर हल्ले केले. ही सर्व हल्ले केल्यानंतर इस्त्रायलची विमाने सुरक्षितपणे परतल्याचे इस्त्रायलच्या प्रवक्ताने म्हटले आहे.
शनिवारी झालेल्या हल्ल्यादरम्यान केवळ इस्रायलच नाही तर अमेरिकेनेही इराणला धमकी दिली आहे. इस्त्रायलने म्हटले आहे की, इराणने प्रत्युत्तर दिल्यास आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. दुसरीकडे अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परंतु इराणने हल्ला केला तर अमेरिका इस्त्रायलची मदत करणार आहे.
इराणवरील हल्ल्यांबाबत इस्त्रायल परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी कोबी शोशानी म्हणाले की, आम्ही संदेश अगदी स्पष्ट दिला आहे. आमच्याशी पंगा घेऊ नका. आम्ही कुठेही अचूक लक्ष्य करू शकते. मध्यपूर्वेत शांतता राखणे हा आमचा उद्देश आहे.