Israel Attack Iran : इस्रायलने इराणमध्ये नेमका हल्ला कुठे केला? सर्वात आधी काय उडवलं?

| Updated on: Oct 26, 2024 | 10:20 AM

Israel Attack Iran : इस्रायलने इराणवर बरोबर 25 दिवसांनी पलटवार केलाय. 1 ऑक्टोंबरला इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अन्य शहरांवर बॅलेस्टिक मिसाइलद्वारे हल्ला केला होता. आम्ही या हल्ल्याचा बदला घेणार असं इस्रायलने त्यावेळी म्हटलं होतं. आज इस्रालयने इराण विरुद्ध तशी कारवाई केली.

Israel Attack Iran : इस्रायलने इराणमध्ये नेमका हल्ला कुठे केला? सर्वात आधी काय उडवलं?
Israel Strikes In Iran
Follow us on

इस्रायलने त्यांच्या रणनितीप्रमाणे पुन्हा एकदा धक्कातंत्र दाखवून दिलय. इस्रायलने शनिवारी मध्यरात्री इराणवर भीषण हल्ला केला. तेहरान आणि कराजच्या चार शहरात 10 पेक्षा जास्त ठिकाणी बॉम्ब वर्षाव झाला. यात मोठ नुकसान झालय. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर IRGC च्या राशिद स्ट्रीटवर असलेल्या इमारतीत मोठी आग लागली. इराणी सैन्याची ही इमारत राशिद स्ट्रीट 154 वर आहे. या हल्ल्याआधी व्हाइट हाऊसला माहिती देण्यात आली होती. तेहरानसह कराज मसाद आणि कोममध्ये सुद्धा हल्ला झाला. इस्रायलने या हल्ल्याद्वारे इराण बरोबरचा हिशोब चुकता केला आहे. ही बदल्याची कारवाई आहे. इस्रायलने पहिल्यांदाच इराणवर थेट हल्ला केला आहे. 1 ऑक्टोंबरला इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइलद्वारे हल्ला केला होता. IDF ने बरोबर 25 दिवसांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

इस्रायली मीडियानुसार इराण विरुद्ध इस्रायली हल्ला तीन टप्प्यात करण्यात आला. आधी इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमला टार्गेट केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिसाइल आणि ड्रोन ठिकाणांना लक्ष्य केलं. त्यानंतर प्रोडक्शन सेंटरवर हल्ला झाला. हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर इराणने 1 ऑक्टोंबरला तेल अवीवर हल्ला केला होता. इस्रायलचा ताजा हल्ला हे त्याचच उत्तर आहे. हा आत्मरक्षणासाठी केलेला हल्ला असल्याच इस्रायलने म्हटलं आहे.

अमेरिकेला कोणी ब्रीफ्रिंग दिली?

इराणवर हल्ला झाला, त्यावेळी संरक्षण मुख्यालयात इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू स्वत: उपस्थित होते. इराण विरुद्ध सुरु झालेल्या या कारवाईवर त्यांचं लक्ष होतं. यावेळी त्यांच्यासोबत इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट सुद्धा होते. इस्रायलने अमेरिकी राष्ट्रपति जो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती दिली. नेतन्याहू यांनी बायडेन यांना इराण विरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची ब्रीफिंग दिली.

इराणने हल्ल्यावर काय म्हटलं?

“इस्रायलने तेहरान, खुजेस्तान आणि इलम प्रांतातील सैन्य तळांना लक्ष्य केलं. आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमने मजबुतीने या हल्ल्याचा सामना केला. काही ठिकाणी नुकसान झालय. आम्ही याची चौकशी करत आहोत. आम्ही लोकांना एकजूट आणि शांतता बाळगण्याच आवाहन करतो. शत्रुच्या मीडियाकडून दिल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये” असं इराणच्या एअर डिफेन्स फोर्सने म्हटलय.