Israel vs Hezbollah : लेबनानची वाट लागली, हिज्बुल्लाह उद्धवस्त, 24 तासात इस्रायलचा 34 वर्षातील सर्वात मोठा हल्ला

| Updated on: Sep 24, 2024 | 9:44 AM

Israel vs Hezbollah : इस्रायलने लेबनानवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये युद्ध सुरु आहे. हिज्बुल्लाहने इस्रायलच्या एअर बेसवर मिसाइल हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने जबरदस्त पलटवार केला आहे. लेबनानला भयानक जखम दिली आहे. लेबनानवर नवीन संकट ओढावलय.

Israel vs Hezbollah : लेबनानची वाट लागली, हिज्बुल्लाह उद्धवस्त,  24 तासात इस्रायलचा 34 वर्षातील सर्वात मोठा हल्ला
Israel Air Strike in lebanon
Follow us on

हिज्बुल्लाह विरुद्ध इस्रायलने विध्वंसक युद्धाची सुरुवात केली आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने संपूर्ण लेबनानमध्ये 1600 पेक्षा जास्त हल्ले केले आहेत. लेबनानमध्ये अनेक ठिकाणी धुर, आगीच्या ज्वाळा, कोसळलेल्या इमारती असं चित्र दिसतय. एअर स्ट्राइकमध्ये हिज्बुल्लाहची 1200 पेक्षा जास्त ठिकाणं उद्धवस्त केल्याचा दावा करण्यात येतोय. 1990 नंतर इस्रायलने लेबनानवर पहिल्यांदाच इतका भीषणा हल्ला केलाय. 34 वर्षानंतर लेबनानवर नवीन संकट ओढावलय. इस्रायलच्या या हल्ल्यात 492 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. जवळपास 2000 लोक जखमी झालेत. इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी लेबनानच्या जनतेशी आमच कुठलही शत्रुत्व नसल्याच स्पष्ट केलय. हिज्बुल्लाहच्या तळाला IDF ने टार्गेट केलं. हल्ला करण्याआधी नागरिकांना हिज्बुल्लाहच्या ठिकाणांपासून दूर जाण्याच आवाहन करण्यात आलं होतं.

 

या हल्ल्यानंतर अमेरिका आणि अरब राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. गाजानंतर इस्रायलने आता लेबनानकडे आपला मोर्चा वळवला आहे. काही तासात इस्रायलने त्यांच्या एअरबेसवर हिज्बुल्लाहने केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. अशी कारवाई केली की, संपूर्ण लेबनान हादरुन गेलं. इतका विध्वंसक हल्ला याआधी इस्रायलने लेबनानवर कधीच केला नव्हता. यावेळी इस्रायलने रहिवाशी वस्तीवर बरोबर हिज्बुल्लाहचे अंडरग्राऊंड तळ बॉम्बफेकीत नष्ट केले.

मोसादचा रोल काय?

हल्ला इतका भीषण होता की, दक्षिण लेबनानमध्ये भिती, दहशतीचा माहौल होता. हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांनी अंडरग्राऊंड ठिकाणांवरुन पळ काढला. हा हल्ला होण्याच्या काही तास आधी हिज्बुल्लाह इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पण मोसादच्या इनपुटच्या आधारावर IDF ने हिज्बुल्लाहचा हल्ला अयशस्वी केला. त्यांचे रॉकेट आणि मिसाइल लॉन्चिंग साइट नष्ट केले.

3DR मिसाइलने हल्ल्याची तयारी

याआधी हिज्बुल्लाहने इस्रायलवर हल्ले केले. त्यामुळे इस्रायली एयरबेसवर आग लागली. आता इस्रायलने बदला घेतला आहे. इस्रायलने हल्ला केला नसता, तर हिज्बुल्लाह आणखी एक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता. हिज्बुल्लाहचे दहशतवादी 3DR मिसाइलने हल्ला करणार अशी मोसादने माहिती दिली होती. 3DR मिसाइलची रेंज 200 किलोमीटर आहे आणि 300 किलो विस्फोटक वाहून नेण्यासाठी हे मिसाइल सक्षम आहे.