Hassan Nasrallah Killed : हसन नसरल्लाहचा गेम ओव्हर, इस्रायलने आठवड्याभराच्या आत हिज्बुल्लाह चीफला उडवलं

| Updated on: Sep 28, 2024 | 2:23 PM

Hassan Nasrallah Killed : IDF ने 60 बंकरविरोधी रॉकेटने हिज्बुल्लाहच्या मुख्यालयाला टार्गेट केलं होतं. नसरल्लाह मारला गेला की नाही? या बद्दल लगेच काही बोलणं घाईच ठरेल, असं हल्ल्यानंतर त्यावेळी इस्रायलने म्हटलं होतं. पण आता हिज्बुल्लाह चीफच्या खात्म्याची इस्रायलने पुष्टी केली आहे. इस्रायलने अत्यंत कमी दिवसात त्यांचं उद्दिष्टय साध्य केलं. गाजा पट्टीनंतर इस्रायलने आता लेबनानकडे मोर्चा वळवला आहे.

Hassan Nasrallah Killed : हसन नसरल्लाहचा गेम ओव्हर, इस्रायलने आठवड्याभराच्या आत हिज्बुल्लाह चीफला उडवलं
hezbollah chief hassan nasrallah
Follow us on

हिज्बुल्लाह विरोधात सुरु केलेल्या लढाईत इस्रायलला मोठ यश मिळालं आहे. इस्रायलने लेबनानकडे मोर्चा वळवल्यानंतर आठवड्याभराच्या आताच हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा केला आहे. इस्रायलने लेबनानची राजधानी बेरुतमध्ये हिज्बुल्लाहच्या मुख्यालयावर भीषण हल्ला केला. IDF ने 60 बंकरविरोधी रॉकेटने हिज्बुल्लाहच्या मुख्यालयाला टार्गेट केलं. हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडरला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असं इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं होतं. या हल्ल्यात हिज्बुल्लाह चीफ नसरल्लाह मारला गेला की नाही? या बद्दल लगेच काही बोलणं घाईच ठरेल, असं हल्ल्यानंतर इस्रायलने म्हटलं होतं. पण आता इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने अधिकृत X हँडलवर पोस्ट करुन हसन नसरल्लाह मारला गेल्याचा दावा केला आहे. ‘हसन नसरल्लाह आता जगाला घाबरवू करु शकत नाही’ असं इस्रायल डिफेन्स फोर्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेचा नेता हसन नसरल्लाह आणि दक्षिणी मोर्चाचा कमांडर अली कारचीसह अन्य कमांडर्सचा खात्मा केलाय” असं आयडीएफ प्रवक्ते डेनियल हगारी यांनी म्हटलं आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक गोपनीय माहितीच्या आधारावर आमच्या एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी हिज्बुल्लाहच्या सेंट्रल हेडक्वार्टरवर टार्गेटेड हल्ला केला. बेरुतच्या दाहियेह क्षेत्रात एका रेसिडेंशियल बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये मुख्यालय होतं. हिज्बुल्लाहची सीनियर लीडरशिप हेडक्वार्टरमध्ये बसून इस्रायली नागरिकांविरोधात दहशतवादी कारवायांची आखणी करत असताना हा हल्ला झाला.

नसरल्लाह बद्दल IDF प्रवक्त्याने काय म्हटलं?

“हिज्बुल्लाह चीफ म्हणून हसन नसरल्लाहवर 32 वर्षाच्या कार्यकाळात इस्रायली नागरिक आणि सैनिकांची हत्या तसच हजारो दहशतवादी हल्ल्याच्या योजना आखणीचे आरोप त्याच्यावर होते. जगभरात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी हसन नसरल्लाह जबाबदार होता. विभिन्न देशातील निरपराध नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला. हिज्बुल्लाहमध्ये नसरल्लाह सर्व मुख्य निर्णय घ्यायचा व रणनिती आखायचा” असं डेनियल हगारी यांनी सांगितलं.

वेळ बघून हिज्बुल्लाहला संपवलं

इस्रायलच गाजा पट्टीत हमास विरुद्ध युद्ध सुरु असताना लेबनानमधून हिज्बुल्लाहकडून उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरु होते. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्तर इस्रायलमधून नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं. हमास विरुद्ध उद्दिष्ट साध्य केल्यानंतर इस्रायलने हिज्बुल्लाहकडे मोर्चा वळवला. आठवड्याभराच्या आत इस्रायलने हिज्बुल्लाहची निम्मी सैन्य शक्ती संपवून टाकली व त्यांच्या प्रमुखालाच संपवलं.