Syria Civil War : असद सत्तेतून बेदखल होताच सीरियात इस्रायली सैन्य तैनात, हा भाग घेतला ताब्यात

| Updated on: Dec 09, 2024 | 9:22 AM

Syria Civil War : सीरियात तख्तापालट होताच इस्रायलने मोठ पाऊल उचललं आहे. इस्रायलने सीरियामध्ये रॉकेट हल्ला करत तिथला एक भाग ताब्यात घेतला आहे. इस्रायलने सीरियामध्ये सैन्य तैनाती केली आहे. 1974 साली सैनिकांना माघारी बोलवण्याचा एक करार झाला होता.

Syria Civil War : असद सत्तेतून बेदखल होताच सीरियात इस्रायली सैन्य तैनात, हा भाग घेतला ताब्यात
IDF
Follow us on

सीरियामध्ये बंडखोरांनी मोठा विजय मिळवला आहे. बशर-अल-असद यांच्या कुटुंबाची अनेक वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. त्यांना देश सोडून पळावं लागलं आहे. सीरियामधील या घडामोडींवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आनंद व्यक्त केला आहे. सीरियातील या अशांत स्थितीचा फायदा उचलत इस्रायली सैन्याने गोलान हाइट्स येथील एक बफर जोन ताब्यात घेतला आहे. सीरियातील असद शासनाच्या पतनानंतर इस्रायलने हे पाऊल उचललं आहे. 1974 साली सैनिकांना माघारी बोलवण्याचा एक करार झाला होता. त्यानंतर इस्रायलकडून सीरियामधील ही पहिली तैनाती आहे.

IDF ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. गोलान हाइट्समध्ये सीरियन सीमेला लागून असलेल्या बफर झोनच्या आत नव्या ठिकाणी सैन्य तैनाती करण्यात आली आहे. सीरियामधील घटनाक्रमाचा आढावा घेतल्यानंतर बफर जोनमध्ये आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ठिकाणी सैन्य तैनाती करण्यात आली आहे, असं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. गोलान हाइट्सचे नागरिक आणि इस्रायली नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

सैन्याला तात्काळ आदेश

1974 मध्ये सैनिकांना माघारी बोलवण्याच्या करारावरील स्वाक्षरीनंतर ही पहिली तैनाती आहे. दोन शत्रु देशांना परस्परांपासून वेगळ ठेवण्यासाठी बफर झोन बनवला जातो. इथे कुठल्या देशाच सैन्य तैनात करता येत नाही. राष्ट्रपती बशर अल असद सीरिया सोडून पळाल्याची बातमी समोर येताच इस्रायली पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली. आपल्या सैन्याला सीरियीन सीमेवरील बफर झोन ताब्यात घेण्याचा आदेश दिला.

1974 साली करार झालेला

इस्रायल आणि सीरियामध्ये 1974 साली एक करार झाला होता. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये बफर झोन बनवण्यात आला होता. या झोनमध्ये दोन्ही देशांच सैन्य जात नाही. असद सरकारच्या पतनानंतर आता हा करार संपुष्टात आला आहे. इस्रायली सैन्याने बफर झोन ताब्यात घेतला आहे.