Israel-Hamas War | इस्रायल सध्या युद्ध लढतोय. इस्रायलचा सर्व फोकस गाजामधून हमासला संपवण्यावर आहे. युद्धामुळे मानवी जीवाला धोका निर्माण झालाय. इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम दिसून आला. 2023 च्या चौथ्या तिमाहीत इस्रायलची GDP 19 % खाली आला होता. 7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या युद्धाचा हा परिणाम आहे, असं सेंट्रल ब्यूरो ऑफ स्टेटिक्सने सांगितलं होतं. पण अलीकडेच बँक ऑफ इस्रायलने परकीय चलनाचे आकडे जाहीर केले. युद्ध लढूनही इस्रायलच्या परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे.
बँक ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2024 च्या अखेरपर्यंत इस्रायलचा परदेशी चलन साठा 206.828 बिलियन अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचला आहे. बँक ऑफ इस्रायलच्या रिपोर्टने सगळ्यांनाच चकीत केलय. युद्धामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की, इस्रायल आपल्या चलनाला मजबूत करण्यासाठी परकीय चलन साठा विकेल. पण त्यांनी आपला चलनसाठा अधिक वाढवलाय.
रेकॉर्ड स्तराला कधी पोहोचलेला?
परकीय चलनसाठा वाढण्यामागच्या कारणाच विश्लेषण करताना बँकने सांगितलय की, हा पुनर्मूल्यांकनाचा रिझल्ट आहे. युद्ध सुरु झालं तेव्हा इस्रायलच परकीय चलन साठा 191 अब्ज डॉलर होता. नोव्हेंबरमध्ये 198, डिसेंबरमध्ये 204, जानेवारीत 206 फेब्रुवारीत 207 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला. डिसेंबर 2021 मध्ये हाच परकीय चलन साठा तब्बल 213 अब्ज डॉलर या रेकॉर्ड स्तराला पोहोचला होता.
युद्धाला किती दिवस झालेत?
इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 150 पेक्षा जास्त दिवस झालेत. हमासच्या हल्ल्यात जवळपास 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायलने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 30 हजार पेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.