जेरुसलेम : इस्रायली सैन्य रणगाड्यासह गाझा पट्टीत घुसलं आहे. संभाव्य मोठ्या जमिनी कारवाईआधी हे छोट्या स्तराच ऑपरेशन आहे. गाझाच्या सीमावर्ती भागात शिरताच समोरच दृश्य पाहून इस्रायली सैन्याला धक्का बसला. त्यांना इथे काही मृतदेह मिळाले. बंधकांच सामान मिळालं. हमासने काही इस्रायली आणि परदेशी नागरिकांना इथेच ठेवल्याची शक्यता आहे. इस्रायली सैन्याने चिलखती गाड्या आणि जवानांच्या एका ग्रुपसह ऑपरेशन लॉन्च केलय. हमासचे दहशतवादी 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये घुसले होते. त्यावेळी त्यांनी 150 लोकांना बंधक बनवलं. किती मृतदेह मिळाले? त्यात बंधकांचे मृतदेह सुद्धा आहेत का? हे इस्रायली सैन्याने स्पष्ट केलं नाहीय. बंधकांशी संबंधित काही सामान ताब्यात घेतलं आहे.
इस्रायली सैन्याने 24 तासाच अल्टिमेटम दिलय. गाजाचा उत्तर भाग रिकामी करण्याचा आदेश दिलाय. या दरम्यान हजारोंच्या संख्येने लोक दक्षिण गाझाच्या दिशेने पलायन करतायत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याची शपथ घेतलीय. सैन्याला गाझा पट्टीच्या दिशेने पाठवलय. चिलखती वाहनांसह रणगाडे पोहोचले आहेत. इस्रायली सैन्याला इथे अनेक मृतदेह मिळाले आहेत. त्यांची ओळख अजून पटलेली नाहीय. इस्रायली मीडियानुसार, हमासच्या दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. बेपत्ता असलेल्या बंधकांच काही सामान मिळालय. गाझा सीमेजवळ किबुत्ज़ येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या जॅकेटवर इस्लामिक स्टेटचा झेंडा आढळलाय. त्याशिवाय त्यांच्याजवळ हल्ल्याची योजना, धार्मिक कागदपत्र, इस्रायली वस्त्यांचे डिटेल्स आणि प्लानिंग डॉक्यूमेंट्स मिळाले आहेत.
इस्रायली सैन्य सुद्धा चक्रावल
दक्षिण इस्रायलमध्ये काही कागदपत्र मिळाली, त्यावर लिहिलं आहे की, “सिक्योरिटी फेंसिंग तोडा. किबुत्जवर हल्ला करा. लोकांना बंधक बनवा व पुढच्या आदेशाची वाट पाहा. बंधकांना गाझा पट्टीत घेऊन या. किबुत्जमधल्या अकीवा यूथ सेंटरमध्ये घुसा. शाळेचा शोध घ्या, जितक्या लोकांना मारु शकता तितक्या लोकांना मारा” हमासच हे प्लानिंग पाहून इस्रायली सैन्य सुद्धा चक्रावून गेल. अशा प्रकारच प्लानिंग मी याआधी कधी पाहिलं नव्हतं, असं इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्याने म्हटलं आहे.