Israel-Hamas war | उलटा गेम, इस्रायलची पॅलेस्टाइनसमोर मोठी अट, बंधक तुमच्या ताब्यात राहतील, पण…

| Updated on: Oct 12, 2023 | 3:43 PM

Israel-Hamas war | इस्रायलने पॅलेस्टाइनसमोर मोठी अट ठेवलीय. हमासचा जगभरात निषेध होतोय. इस्रायलने गाझा पट्टीतील पूर्ण नेटवर्क तोडून टाकलय. 150 लोकांना बंधक बनवून ठेवलय.

Israel-Hamas war | उलटा गेम,  इस्रायलची पॅलेस्टाइनसमोर मोठी अट, बंधक तुमच्या ताब्यात राहतील, पण...
israel Hamas war
Follow us on

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात एक नवीन वळण आलय. हमासने जवळपास 150 लोकांना बंधक बनवून ठेवलय. इस्रायल आणि हमासमध्ये 7 ऑक्टोबरपासून लढाई सुरु आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून तांडव केलं. रॉकेट हल्ला केला. 1 हजारपेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्याशिवाय दुसऱ्या देशाचे 100 पेक्षा जास्त लोक मारले गेले. हमासने अनेक लोकांना बंधक बनवलय. या कृत्यानंतर हमासचा जगभरात निषेध होतोय. गाझा पट्टीत हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जातय. गाझा पट्टीत इस्रायली फायटर विमानांकडून सातत्याने बॉम्बफेक सुरु आहे. इस्रायलने हमासला मूळापासून संपवण्याची शपथ घेतली आहे. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनमधील सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा मृत्यू होतोय. दहशतवाद्यांशिवाय महिला आणि मुलं सुद्धा आपल्या प्राणाला मुकतायत.

इस्रायलने गाझा पट्टीतील पूर्ण नेटवर्क तोडून टाकलय. वीज आणि पाणी पुरवठा खंडीत केलाय. पॅलेस्टिनी जनतेसमोर खाण्या-पिण्याच संकट निर्माण झालय. खरंतर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तुरुंगातील दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बंधक बनवल होतं. पण आता उलटा गेम झालाय. इस्रायलने पॅलेस्टाइनसमोर मोठी अट ठेवलीय. जो पर्यंत हमास इस्रायली बंधकांना सोडणार नाही, तो पर्यंत गाझामधील वीज-पाणी बंद राहील.

कुठे झाली इमर्जन्सी बैठक?

इस्रायलने हे जे पाऊल उचललं, त्यावर टीका सुरु झालीय. पॅलेस्टाइन मुद्यावरुन बुधवारी अरब लीगच्या 22 देशांनी काहिरामध्ये इमर्जन्सी बैठक केली. त्यांनी इस्रायलसाठी फर्मान जारी केलं. इस्रायलने गाझा पट्टीवरुन सर्व निर्बंध हटवावेत, असं अरब लीगच्या देशांनी एकमताने ठरवलं. हमासने सर्वातआधी आमच्या बंधकांना सोडावं, त्यानंतर वीज-पाण्य़ाचा पुरवठा सुरु होईल. हमासने जवळपास 150 लोकांना बंधक बनवून ठेवलय. यात इस्रायली नागरिकांशिवाय अमेरिकी सुद्धा आहेत. बंधकांच्या सुटकेसाठी बोलणी सुरु आहेत. इस्रायलने आता हमाससमोर अट ठेवलीय.