जेरुसलेम : गाझामधील रुग्णालयांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक देशांमध्ये जबरदस्त आक्रोश आहे. जॉर्डन, बेरूत, तेहरान, सीरिया, जेनिन आणि बगदाद या देशांमध्ये जबरदस्त विरोध प्रदर्शन सुरु आहे. येरूशलममध्ये भीषण गोळीबार सुरु आहे. येरुशलमच्या मशिदीतून चिथावणीखोर घोषणा दिल्या जात आहेत. आता सगळ्यांना युद्धाच्या मैदानात उतराव लागेल, असं मशिदीतून सांगितलं जात आहे. आम्ही आता शांत बसलो, तर ती लाजिरवाणी बाब ठरेल. नागरिकांना नरसंहाराविरोधात एकजूट व्हाव लागेल, अशी जेनिनच्या मशिदीतून घोषणा करण्यात आलीय. रुग्णालयावरील रॉकेट हल्ल्यात एकाचवेळी 500 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे इस्लामिक जगतात प्रचंड रोष, रागाची भावना आहे. रुग्णालयावरील हवाई हल्ल्यानंतर युद्ध अधिक भडकलय. या हल्ल्यानंतर अंकारा, अम्मान, बेरूत, बगदाद येथील इस्रायली दूतावासाबाहेर विरोध प्रदर्शन सुरु आहेत.
जॉर्डनमध्ये सुरक्षापथकं आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडप झालीय. रुग्णालयावरील हवाई हल्ल्यानंतर पॅलेस्टाइनच समर्थन करणारे मिडिल इस्टमधील अनेक देश रागात आहेत. सगळ्याच देशांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केलाय. या गुन्ह्याच इस्रायलला उत्तर द्याव लागेल, असं पॅलेस्टाइनने म्हटलं आहे. इजिप्तने गाझाच्या रुग्णालयावरील इस्रायलच्या हवाई हल्ल्याचा निषेध केलाय. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच थेट उल्लंघन आहे, असं इजिप्तने म्हटलय. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात निष्पाप, निरपराध लोक मारले गेले, असं इराणने म्हटलय. इराणकडून इस्रायलला सतत धमकी दिली जातेय.
‘आम्ही या युद्धासाठी तयार आहोत‘
मानवतेवरील हा सर्वात मोठा खुनी हल्ला असून हा नरसंहार असल्याच सीरियाने म्हटलय. हे सरळसरळ आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन आहे, असं सौदी अरेबियाने म्हटलय. हा युद्ध गुन्हा आहे, अशी जॉर्डनची भूमिका आहे. आता राग जाहीरपणे व्यक्त करण्याची वेळ आलीय, असं हिजबोलाने म्हटलय. आम्ही या युद्धासाठी तयार आहोत, लोकांना घराबाहेर पडण्याच हिजबोलाने आवाहन केलय.