Hamas supporters : हमास-इस्रायल युद्धाचा आज सहावा दिवस आहे. या युद्धामुळे जग दोन गटात वाटला गेला आहे. कोणी इस्रायलच्या बाजुने आहे तर कोणी पॅलेस्टीनला पाठिंबा देत आहे. आता फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या समर्थनार्थ हजारो लोकं रस्त्यावर उतरले. यावेळी या आंदोलकांनी ज्यू लोकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी यानंतर या लोकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. एवढेच नाही तर काही आंदोलकांना पोलिसांनी अटकही केली. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्सने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या विषयावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली आहे.
युनायटेड किंगडममध्ये अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले. हे लोकं हमासच्या समर्थनार्थ निदर्शने करत होती. एका व्यक्तीने इस्रायली ध्वजाच्या जागी पॅलेस्टिनी ध्वज लावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे इंग्लंडमधील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
It’s illegal to support terror organizations in France. Police break up a massive protest celebrating Hamas. pic.twitter.com/lmla37iolQ
— Catch Up (@CatchUpFeed) October 10, 2023
पॅलेस्टाईन आणि हमास समर्थकांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्येही निदर्शने केली. पॅलेस्टिनी समर्थकांच्या एका गटाने न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर रॅली काढली. मात्र, यादरम्यान इस्रायलच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या लोकांशी त्यांची हाणामारी झाली. याशिवाय पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्यांनी अटलांटा आणि शिकागो येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने केली. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरशिवाय इतर मोठ्या नेत्यांनीही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीचा निषेध केला.