जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. रविवारी इस्रायलने गाजा पट्टीत निर्णायक हल्ला केला. इस्रायलने गाजा पट्टीची दोन भागात विभागणी केल्याच जाहीर केलय. सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, इस्रायली सैन्याने गाजा शहराला घेराव घातलाय. आता गाजामध्ये उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडल्याचे त्यांनी सांगितलं. इस्रायली सैन्य समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचलय. हमासने जमिनीच्या आत बोगदे बांधून साम्राज्य उभ केलं होतं. आता इस्रायलने त्यावर प्रहार सुरु केलाय, असं हगारीच्या हवाल्याने अल जजीराने म्हटलय.
IDF कुठल्याही क्षणी उत्तर गाजावर हल्ल्यासाठी तयार आहे, असं जनरल स्टाफचे प्रमुख एलटीजी हर्ज़ी हलेवी यांनी एका बैठकीत सांगितलं. हमास त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांना जो पर्यंत सोडणार नाही, तो पर्यंत अजिबात युद्धविराम होणार नाही असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलय. द टाइम्स ऑफ इस्रायलने हे वृत्त दिलय. नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून एक स्टेटमेंट प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात त्यांनी म्हटलय की, यातून (‘युद्धविराम’ शब्द) शब्दकोषातून बाहेर काढा. हमासला पराभूत करत नाही, तो पर्यंत आमच युद्ध सुरु राहील. आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीय.
500 किलोमीटरपर्यंत भूमिगत बोगदे
अमेरिकेतील इस्रायली राजदूत मायकल हर्जोग यांनी गाजा जगातील सर्वात मोठा दहशतवादी परिसर असल्याच म्हटलं. “इथे हजारो दहशतवादी, रॉकेट्स शिवाय अन्य शस्त्र असल्याच म्हटलं. 500 किलोमीटरपर्यंत पसरलेले भूमिगत बोगदे आहेत. आम्हाला हे सर्व उद्धवस्त करायच आहे. कारण आम्ही असं केलं नाही, तर ते वारंवार हल्ले करत राहतील” असं मायकल हर्जोग यांनी सांगितलं.