Israel-Hamas War | हमास तासाभरात इस्रायलच्या सर्व बंधकांना सोडण्यास तयार, पण….

| Updated on: Oct 18, 2023 | 10:05 AM

Israel-Hamas War | बंधकांना सोडण्यास तयार, पण हमासने इस्रायलसमोर काय अट ठेवलीय? कुठल्या हल्ल्यानंतर हमासने तडजोडीची तयारी दाखवलीय? सध्या इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे.

Israel-Hamas War | हमास तासाभरात इस्रायलच्या सर्व बंधकांना सोडण्यास तयार, पण....
israel pm
Follow us on

जेरुसलेम : हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात 1 हजारपेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या दहशतवाद्यांनी एकाचवेळी 5 हजार रॉकेट्स इस्रायलमध्ये डागले. त्यामुळे रॉकेट हल्ला रोखणारी आर्यन डोम यंत्रणा सुद्धा फेल ठरली. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला करताना मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अत्यंत क्रूर वर्तन केलं, इस्रायली जनतेवर अत्याचार केले. हमासचे हे दहशतवादी अनेक इस्रायली नागरिकांना बंधक बनवून आपल्यासोबत घेऊन गेले. हमासनी त्यांच्या ताब्यात असलेल्या बंधकांचे काही फोटो रिलीज केले आहेत. हमासने तडजोड करण्याच्या उद्देशाने इस्रायली नागरिकांना बंधक बनवल होतं. इस्रायली तुरुंगात बंद असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांची सुटका करण हा हमासचा उद्देश होता.
आता हमास या दहशतवाद्यांची सुटका करण्यास तयार असल्याची माहिती आहे. एका न्यूज एजन्सीने हे वृत्त दिलय.

इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने बॉम्ब वर्षाव सुरु आहे. हमासचे अनेक तळ उद्धवस्त करण्यात ये आहेत. आता हमास बंधकांच्या सुटकेसाठी तयार आहे. फक्त त्यांनी इस्रायलसमोर एक अट ठेवलीय. बॉम्ब हल्ले बंद करण्याची त्यांनी मागणी केलीय. हमासच्या एका नेत्याने न्यूज एजन्सीशी बोलताना हे सांगितलं. गाझा पट्टीत इस्रायली लष्कराने आपली कारवाई थांबवली, तर तासाभरात सर्व बंधकांची सुटका करु, असं हमासच्या या नेत्याने म्हटलं आहे.

इस्रायलच म्हणणं काय?

गाझामधील रुग्णालयावर काल भीषण हल्ला झाला. यात 500 नागरिक ठार झाले. त्यानंतर हमासकडून ओलिसांच्या सुटकेसाठी लगेच ही अट ठेवण्यात आली. इस्रायलने हॉस्पिटलवरील रॉ़केट हल्ल्याचा आरोप फेटाळून लावलाय. इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेने डागलेल रॉकेटच या हॉस्पिटलवर पडलं असं इस्रायलच म्हणणं आहे.