Israel-Hamas War | ‘पोट कापलेलं आणि नाळेला जोडलेलं बाळ….’ हमासच्या दहशतवाद्यांकडून नीचतेचा कळस

| Updated on: Oct 13, 2023 | 9:56 AM

Israel-Hamas War | प्रेत उचलणाऱ्या माणसाने सांगितला भयानक अनुभव. "ज्या रस्त्यावरुन आम्ही 15 मिनिटात पोहोचू शकतो, तिथे आम्हाला 11 तास लागले. कारण रस्त्यावर पडलेले मृतदेह आम्ही बॅगमध्ये भरत होतो"

Israel-Hamas War | पोट कापलेलं आणि नाळेला जोडलेलं बाळ.... हमासच्या दहशतवाद्यांकडून नीचतेचा कळस
Israel Hamas War kibbutz Kfar Aza
Image Credit source: AFP
Follow us on

जेरुसलेम : हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलवर फक्त हल्लाच केला नाही, तर त्यांनी मानवतेच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवल्या. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून क्रौर्याचा कळस गाठला. हमासच्या दहशतवाद्यांची कृत्य निदर्यता आणि नीचतेमध्ये मोडणारी आहेत. माणुसकीला त्यांनी अक्षरक्ष: काळीमा फासला. त्यांनी केलेले गुन्हे किती भयानक आहेत, ते आता हळूहळू समोर येऊ लागलय. एका गर्भवती महिलेसोबत त्यांनी खूपच धक्कादायक कृत्य केलं. योसी लांडौ हे मागच्या अनेक दशकांपासून इस्रायलमध्ये प्रेत उचलण्याच काम करतायत. पण हमासच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह उचलतानाचा त्यांचा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. योसी लांडौ यांची शनिवारची सकाळी युद्धाच्या सायरनने झाली. रॉकेट हल्ल्यानंतर बचाव करण्यासाठी इस्रायली शेल्टरचा आधार घेतात. त्यांच्यासाठी ही बाब नवीन नव्हती.

त्यांना वाटल हे नेहमीसारख आहे. पण हळूहळू वेळ जशी पुढे सरकत गेली, तेव्हा त्यांना हमासच्या हल्ल्याची भीषणता लक्षात आली. हमासच्या या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. गाझा पट्टीच्या उत्तरेला एशदोदमध्ये ते राहतात. घटनास्थळी पोहोचल्यानंतर योसी लांडौ यांनी अमानुषपणाची भीषणता अनुभवली. रस्त्यावर लोकांचे मृतदेह पडलेले होते, असं त्यांनी सांगितलं. ते सेडरोटमध्ये होते. सीमेजवळ असलेल्या या शहरात घुसून हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्या केली. इस्रायलच मदत आणि बचाव पथक झाकासाठी काम करण्याच त्यांच्याकडे 33 वर्षांचा अनुभव आहे. अनैसर्गिक मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह उचलण्याच काम झाका संस्था करते.

मृतदेह रेफ्रिजेटर असलेल्या ट्रकमध्ये भरले

‘असा हिंसाचार मी याआधी कधीही पाहिलेला नाही’, असं योसी लांडौ यांनी सांगितलं. “ज्या रस्त्यावरुन आम्ही 15 मिनिटात पोहोचू शकतो, तिथे आम्हाला 11 तास लागले. कारण रस्त्यावर पडलेले मृतदेह आम्ही बॅगमध्ये भरत होतो” असं 55 वर्षीय योसी लांडौ म्हणाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या कार जाळण्यात आलेल्या होत्या. गोळीमुळे कारच्या पत्र्याला पडलेली छिद्र दिसत होती. अनेक मृतदेह रेफ्रिजेटर असलेल्या ट्रकमध्ये भरले. त्यानंतर योसी आणि झाकाचे स्वयंसेवक किबुट्झमध्ये पोहोचले. गाझापासून पाच किमी अंतरावर असलेले हे शहर 1200 लोकवस्तीच आहे.

महिलेचा मृतदेह होता, पण समोरच दृश्य खूपच भयानक

“या शहरातील पहिल्या घरात प्रवेश केल्यानंतर फक्त मलाच नाही, माझ्यासोबत असलेल्या सगळ्यांना मोठा धक्का बसला. माझ्या डोळ्यासमोर एका महिलेचा मृतदेह होता. पण समोरच दृश्य खूपच भयानक अंगावर काटा आणणार होतं. ही महिला गर्भवती होती. तिचं पोट फाडून नाळेला जोडलेल्या बाळाची हत्या करण्यात आली होती. ते दृश्य खूप भयानक होतं” असं योसी लांडौ यांनी सांगितलं.