Israel Hamas War | म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एकाचवेळी 250 लोक कसे मारले गेले? धक्कादायक सत्य समोर

| Updated on: Oct 10, 2023 | 9:18 AM

Israel Hamas War | लोकांना आपला जीव का वाचवता आला नाही?. तिथे काय परिस्थिती होती. एक व्हिडिओमध्ये इस्रायली महिला आणि तिच्या प्रियकराची ओळख पटवण्यात आली आहे.

Israel Hamas War | म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एकाचवेळी 250 लोक कसे मारले गेले? धक्कादायक सत्य समोर
Israel Hamas War How 250 dead in desert music festival
Follow us on

जेरुसलेम : हमासच्या भीषण हल्ल्यात आतापर्यंत 900 इस्र्यायलींचा मृत्यू झालाय. यात नागरिकांसह सैनिक आहेत. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून हैदोस घातला. वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. पण एकाच ठिकाणी 250 नागरिकांचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना इस्रायलमध्ये घडली आहे. इस्रायलच्या नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये ही दुर्देवी घटना घडली. संपूर्ण रात्रभर इथे डान्स पार्टी चालणार होती. पण हमासच्या हल्ल्यामुळे सगळ काही बदलून गेलं. आनंदाची जागा दु:खाने घेतली. हमासने या म्युझिक फेस्टीव्हलमध्ये घुसून अनेकांना बंधक बनवलं. त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत. “एका मोकळ्या जागेत पार्टी सुरु होती. आम्हाला लपण्यासाठी कुठे जागाच नव्हती. हमासचे दहशतवादी घुसल्यानंतर एकच पळापळ सुरु झाली” असं या फेस्टीव्हलला उपस्थित असलेल्या ताल गिबलीने सांगितलं. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी तो बोलत होता.

म्युझिक फेस्टीव्हलपासून दोन किमी अंतरावरच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैनिक आणि रणगाड्यांवर हल्ले सुरु केले होते. व्हिडिओमध्ये अनेक जण आपल्या कारमधून तसेच धावत मोकळ्या शेतात पळताना दिसत होते. त्यांच्या पाठिमागे गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. गाझा पट्टीजवळ हा म्युझिक फेस्टीव्हल सुरु होता. हमासने बंधक बनवल्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेत. एक व्हिडिओमध्ये इस्रायली महिला आणि तिच्या प्रियकराची ओळख पटवण्यात आली आहे. आरगामनी असं या महिलेच नाव आहे. आरगामनी मोटरसाय़कलवर असून ती मदतीसाठी याचना करताना दिसतेय.

पॅलेस्टाइनमध्ये किती लोकांचा मृत्यू?

इस्रायलने आता या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. नागरिक आणि सैनिक मिळून 150 जणांना हमासने बंधक बनवल्याची माहिती आहे. या भीषण युद्धात आतापर्यंत 900 इस्रायलींचा मृत्यू झाला असून 2,600 जखमी झाले आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इस्रायलकडून गाझा पट्टीत एअर स्ट्राइक सुरुच आहेत. त आतापर्यंत 687 पॅलेस्टाइनचा मृत्यू झाला आहे. गाझन आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय. अन्य 3000 जखमी झाले आहेत.