Iran vs Israel | करारा जवाब मिलेगा, इराणची खुली धमकी, गाजाच्या बाहेर बदल्याला सुरुवात का?

| Updated on: Jan 04, 2024 | 11:04 AM

Iran vs Israel | युद्ध इस्रायल आणि हमासमध्ये सुरु आहे. पण नुकसान इराणच सुद्धा होतय. बुधवारी इराण दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरलं. यात 100 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेचे येणाऱ्या दिवसात तीव्र पडसाद उमटू शकतात. आणखी एखादी नवी आघाडी उघडली जाणार का?

Iran vs Israel | करारा जवाब मिलेगा, इराणची खुली धमकी, गाजाच्या बाहेर बदल्याला सुरुवात का?
iran vs israel
Follow us on

Iran vs Israel | रशिया, युक्रेन, इस्रायल आणि गाजा ही जगातील अशी 4 ठिकाण आहेत, जिथे मागच्या काही महिन्यांपासून लोक दहशतीखाली जीवन जगत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध केव्हा संपणार? या प्रश्नाच उत्तर व्लादिमीर पुतिन आणि जेलेंस्कीच देऊ शकतात. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाला सुरुवात झाली. त्याच्या ज्वाळा इराणपर्यंत पोहोचल्या आहेत. इराण थेट युद्ध लढत नाहीय, पण तरीही त्यांचं तितकच नुकसान होतय, जितक युद्ध लढणाऱ्या देशाच होतं. मागच्या 4 वर्षात त्यांचे दोन टॉप कमांडर ठार झालेत.

इस्रायल-हमास युद्धात इराणची भूमिका जगजाहीर आहे. अमेरिका आणि इराण परस्परांचे शत्रू समजले जातात. अमेरिका युद्धात इस्रायलच्या बाजूने आहे. त्याचवेळी इराण दोन्ही देशांना नडण्याचा प्रयत्न करतोय. येमेनमधील हुती बंडखोर, हमास यांना इराणने पोसलय. हे हुती बंडखोर लाल सागरात इस्रायली आणि अमेरिकन मालवाहू जहाजांना लक्ष्य करतायत. अमेरिकेने नुकतीच या हुती बंडखोरांवर कारवाई केली. इस्रायलची गाजा पट्टीत सुरु असलेली कारवाई सुद्धा इराणला मान्य नाहीय. इराण सातत्याने इस्रायलला परिणाम भोगण्याची धमकी देत आलाय.

तणाव आणखी वाढणार

बुधवारी इराणच्या केरमान शहरात अल जमान मशिदीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. इराणचा दिवंगत टॉप जनरल कमांडर कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट झाले. यात 100 पेक्षा जास्त लोक ठार झाले. सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदिनी इराणी नागरिक मोठ्या संख्येने त्याच्या कबरीजवळ जमले होते. त्यावेळी काही मिनिटांच्या अंतराने हे दोन बॉम्बस्फोट झाले. येणाऱ्या दिवसात इराण आणि इस्रायलमधील तणाव आणखी वाढणार आहे.

‘किंमत चुकवावी लागेल’

इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी या बॉम्बस्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरलय. इस्रायलला याची किंमत चुकवावी लागेल असं वाहिदी यांनी म्हटलय. इराण विरुद्ध ही क्रूरता आणि मानवतेच्या विरोधात असल्याच रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं आहे. आम्ही इराणसोबत उभे आहोत, अशी पुतिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेरुतमध्ये ड्रोन हल्ल्यात इराणचा सहकारी आणि हमासचा नंबर दोन कमांडर सालेह अल-अरूरी ठार झाला. त्यानंतर लगेचच हे बॉम्बस्फोट झाले.