जेरुसलेम : सध्या गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. इस्रायली सैन्य अजून गाझा पट्टीत पूर्णपणे घुसलेलं नाहीय. पण काही प्रमाणात गाझा पट्टीत छापेमारीची कारवाई सुरु आहे. गाझा पट्टी हा घनदाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. तिथे आमने-सामनेच्या लढाईत इस्रायली सैन्याचही मोठ नुकसान होऊ शकतं. आता प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईत हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायली सैन्याने आर्यन स्टिंग बाहेर काढलय. या आर्यन स्टिंगपासून हमासचे दहशतवादी वाचण्याची शक्यता फार कमी आहे. इस्रायलच हे नवीन अस्त्र असून आर्यन स्टिंग गेम चेंजर ठरेल. त्याचे काय फायदे आहेत? हे शस्त्र काय आहे? ते समजून घेऊया. 22 ऑक्टोबर 2023 ला इस्रायली सैन्याने सर्वप्रथम आर्यन स्टिंगचा वापर केला. हमासच्या तळांवर आर्यन स्टिंग डागण्यात आलं. आर्यन स्टिंग ही 120 MM गाईडेड मोर्टार आहे. इस्रायलच्या एलबिट सिस्टिमने हे गाईडेड मोर्टार बनवलेत.
आर्यन स्टिंगने अत्यंत अचूकतेने आपलं उद्दिष्ट्य साध्य केलं. या 120 MM गाईडेड मोर्टारची कामगिरी उत्तम आहे. जमिनी युद्धामध्ये हे अस्त्र क्रांतिकारी ठरेल. यामुळे अत्यंत अचूक आणि परिणामकारक फायरपावर इस्रायली सैन्याला मिळणार आहे. हमास विरोधी युद्धात आर्यन स्टिंग गेम चेंजर अस्त्र असल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे. शत्रूची रॉकेट्स आणि बोगद्याची जी क्षमता आहे, त्यावर आर्यन स्टिंगमुळे बऱ्याच प्रमाणात वरचढ होता येईल, असं इस्रायलने म्हटलय. पारंपारिक मोर्टार जे आहेत, त्यात काही चुका होऊ शकतात. नागरिकांची जिवीतहानी होऊ शकते, मालमत्तेच नुकसान होऊ शकतं. आर्यन स्टिंग मोर्टारच्या गायडेड क्षमतेमुळे अत्यंत अचूकतेने, ठरलेल्या टार्गेटवर प्रहार करता येऊ शकतो. गाझाच्या गजबजलेल्या वस्तीमध्ये हे मोर्टार निर्णायक ठरतली. ज्यामुळे मानवी नुकसान कमी होईल.
आर्यन स्टिंग महाग असलं, तरी बराच खर्च वाचणार
हमासचे दहशतवादी नागरी वस्त्यांमधून ऑपरेट करतात. तिथल्या नागरिकांचा ढालीसारखा वापर करतात. आर्यन स्टिंगमुळे जिवीतहानी कमी करता येईल. पारंपारिक मोर्टारपेक्षा गाईडेड मोर्टार महागड्या आहेत. दीर्घकाळाच्या दृष्टीने विचार केल्यास याच्या वापरामुळे खर्च कमी होईल. कारण, कमी राऊंडस फायर करुन अपेक्षित रिझल्ट मिळेल. दारुगोळ्य़ावरचा खर्चही कमी होईल.