Israel – Hamas War : हमास आणि इस्रायल यांच्यात १२ दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष आता आIsrael Hamas War:णखी वाढण्याची शक्यता आहे. हे युद्ध आता मोठे होणार आहे. गाझाच्या सीमेवर इस्रायलने हमासला संपवण्याची योजना अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. पाश्चिमात्य देशांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे इस्रायलचे मनोधैर्य आणखी उंचावले आहे. ते गाझामध्ये घुसून आता हमासचा नाश करणार आहे. इस्रायलने सीमेवर शेकडो रणगाडे आणि सैनिक सीमेवर तैनात केले आहेत. सीमेवर वाढलेली ही हालचाल पाहून असा अंदाज येतो की, इस्रायली सैनिक फक्त एकाच आदेशाची वाट पाहत आहेत, त्यानंतर गाझामध्ये जमिनीवरुन हल्ला सुरू होईल.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, गाझावर जमिनीवरुन मारा करणारे क्षेपणास्त्रे डागली जाण्याची शक्यता असतानाच गुरुवारी दक्षिण इस्रायलमधील सीमेजवळ शेकडो इस्रायली रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. सध्या लष्कराचे उच्च अधिकारी देशाची राजकीय स्थिती स्पष्ट होण्याची वाट पाहत आहेत. इस्त्रायली सैन्य या भागात तैनात करण्यात आले आहे, ज्यामुळे गाझामधील हमासवर लवकरच जमिनीवर हल्ला होऊ शकतो.
इस्रायली संरक्षण दल (आयडीएफ) ने सांगितले की लेबनीज भागातून प्रक्षेपित केलेल्या नऊपैकी चार रॉकेट रोखण्यात आले आणि लेबनॉनमधून इस्रायली सैन्याच्या दिशेने अनेक टँकविरोधी क्षेपणास्त्रे डागण्यात आली. IDF ने म्हटले आहे की लेबनीज हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील ठिकाणांना लक्ष्य केले. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आला.
इस्रायली सैन्याने IDF च्या UAV (Unmanned Aerial Vehicle) चा वापर करून दहशतवादी सेल उद्ध्वस्त करून नष्ट केल्याचा दावाही केला आहे. मात्र, इस्रायल गाझा पट्टीत सर्वतोपरी जमिनीवर हल्ला करण्यासाठी सज्ज असला, तरी त्यापुढील आव्हान काही कमी नाही. इस्रायलसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे हमासचे या भागात पसरलेले भूगर्भीय बोगद्याचे जाळे. हमासने गाझामध्ये असे बोगदे बांधले आहेत, ज्यात घुसणे इस्रायली सैन्याला सोपे जाणार नाही. अनेक तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जमिनीवर हल्ला झाल्यास इस्रायल हा हमासपेक्षा अग्निशक्तीच्या बाबतीत कमकुवत ठरू शकतो, कारण त्याला शत्रूशी त्याच्याच भूभागावर लढावे लागेल.
एकीकडे गाझामध्ये दाट लोकसंख्या आहे आणि दुसरीकडे बोगद्यांचे भयंकर जाळे आहे, त्यामुळे ते IDF अर्थात इस्रायली लष्करासाठी आव्हानापेक्षा कमी नाही. हमासचा नायनाट करण्यासाठी गाझावर हल्ला करण्याची तयारी आहे. इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी देखील हे आव्हानात्म असल्याचं म्हटलं आहे.