Israel-Hamas War | काय? गाझामध्ये इस्रायलने व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब वापरला, किती घातक आहे?

| Updated on: Oct 11, 2023 | 7:19 PM

Israel-Hamas War | व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब किती घातक आहे? त्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो? व्हाइट फॉस्फोरस वापरासाठी कठोर नियमन का आहे? इस्रायलने याआधी कधी या घातक अस्त्राचा वापर केला होता.

Israel-Hamas War | काय? गाझामध्ये इस्रायलने व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब वापरला, किती घातक आहे?
Is Israel using white phosphorus weapons in Gaza
Follow us on

जेरुसलेम : सध्या इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. इस्रायलच्या फायटर विमानांकडून गाझा पट्टीतील हमासच्या तळांना लक्ष्य केलं जात आहे. अनेक मोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत. इस्रायल आणि हमासच्या युद्धात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. आता अनेक मीडिया रिपोर्ट्समधून इस्रायली सैन्य दाट लोकवस्तीच्या भागात व्हाइट फॉस्फोरसचा वापर करतय, असा आरोप केला जात आहे. गाझा पट्टी म्हणजे पृथ्वीवरील सर्वात गर्दी आणि वर्दळीच ठिकाण. हमसाच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाइनचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. अन्न, इंधन पुरवठ्याचे मार्ग बंद केले आहेत. हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 1 हजारपेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून गाझा पट्टीतही 700 च्या वर नागरिकांनी प्राण गमावले आहेत.

अनेक फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडियावरुन इस्रायली सैन्यावर गाझामध्ये व्हाइट फॉस्फोरसचा वापर केल्याचा आरोप होतोय. व्हाइट फॉस्फोरस संदर्भात काही कठोर नियम आहेत. इस्रायलवर याचा वापर केल्याचा आरोप पहिल्यांदा होत नाहीय. आधी इस्रायलने आंतरराष्ट्रीय दबाव झुगारुन अनेक महिने व्हाइट फॉस्फोरस वापरल्याचा आरोप फेटाळून लावला होता. पण नंतर त्यांनी मान्य केलं होतं. गाझा पट्टीत डिसेंबर 2008 आणि जानेवारी 2009 साली इस्रायलने आक्रमण केलं होतं. त्यावेळी त्यांनी व्हाइट फॉस्फोरसच्या दारुगोळ्याचा वापर केला होता. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार व्हाइट फॉस्फोरसच्या वापरावर बंदी नाहीय. पण त्याच्यामुळे शरीरावर जे परिणाम होतात, त्यामुळे व्हाइट फॉस्फोरसच्या वापरासाठी कठोर नियमन आहे.

व्हाइट फॉस्फोरस बॉम्बमुळे शरीरावर काय परिणाम होतो?

व्हाइट फॉस्फोरसमधील केमिकल घटकामुळे हा बॉम्ब जास्त धोकादायक आहे. व्हाइट फॉस्फोरसच जळण्याच तापमान 800 ते 2500 सेल्सियस आहे. ही आग सहजासहजी विझत नाही. य़ा बॉम्बच्या संपर्कात आल्यास शरीरावर खूप घातक परिणाम होतात. व्हाइट फॉस्फोरसमुळे हाडांपर्यंत खोलवर भाजल्याच्या जखमा होतात. सुरुवातीच्या उपचारानंतर टिश्यूची पुन्हा जळजळ सुरु होते. लष्करी डॉक्टरांना उपचार करताना खूप अडचणी येतात. त्याशिवाय वेळेत उपचार मिळणं अवघड असतं. व्हाइट फॉस्फोरस बॉम्बमध्ये विषारी घटक असतात. त्यामुळे या हल्ल्यातून बचावलेल्या माणसाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो. नागरी इमारती, शेती पीक नष्ट करण्यासाठी सुद्धा या बॉम्बचा वापर केला जाऊ शकतो.